शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: बांदा बसस्थानकानजीक सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 17:23 IST

मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा बसस्थानकानजीक ढाब्यासमोर दुभाजकात  सडलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. डंपरचालकाच्या निदर्शनास मृतदेह पडल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळेव कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. सदर इसम सडलेल्या स्थितीत असल्याने चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने ओळख पटलेली नाही. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा बसस्थानक नजीकच्या ढाब्यासमोर दुभाजकामध्ये सडलेल्या स्थितीत मृतदेह असल्याची माहिती डंपरचालकाने दिली. सदर इसमाच्या अंगावर खाकी शर्ट व राखाडी कलरची पँट होती. मृतदेह पूर्णपणे कुजून गेला होता. दुभाजकात गवत वाढल्याने तो कोणाच्याही निदर्शनास पडला नाही. बांदा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात आणला. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. मृत ४० ते ४५ वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. ३ ते ७ दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्हत्या. मृताचा मृ्त्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस