अंध बांधवांना सर्वतोपरी मदत गरजेची
By Admin | Updated: October 16, 2015 22:41 IST2015-10-16T21:18:01+5:302015-10-16T22:41:06+5:30
अनंत उचगावकर : कणकवलीत जागतिक पांढरी काठी दिन

अंध बांधवांना सर्वतोपरी मदत गरजेची
कणकवली : अंध बांधव हे समाजातील एक घटक आहेत. ते स्वावलंबी होण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करीत असतात. समाजऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आपण सर्वांनी सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे, असे मत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी व्यक्त केले.येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात गुरुवारी जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब आॅफ कणकवली सेंट्रल तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी नॅबचे सचिव गजानन तेंडुलकर, खजिनदार भालचंद्र कशाळीकर, विकास अधिकारी माधव ताटकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा मेघा गांगण, सचिव अनिल कर्पे, दीपक बेलवलकर, नितिन बांदेकर, वर्षा बांदेकर, धनंजय कसवणकर, डॉ. सुहास पावसकर, अंकिता कर्पे, अॅड. दीपक अंधारी, संतोष कांबळी, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप सोरटे, पॅराडाईज फाऊंडेशनचे विनय सावंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत उचगावकर पुढे म्हणाले, नॅबतर्फे अंध बांधवाना मुंबईसारख्या शहरात फिरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते हळूहळू स्वावलंबी बनत आहेत. तसेच अनेकजण व्यवसाय करीत आहेत. ही सर्व प्रगती पांढऱ्या काठीच्या आधारावर होत आहे. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लबने समाजसेवेचा घेतलेला हा वसा उल्लेखनीय असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले. यावेळी अंध बांधवाना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात आले. अंध बांधवांसाठी निधी जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. काही अंध बांधवांनी गितेही सादर केली. त्यालाही उपस्थितांकडून चांगली दाद मिळाली. (वार्ताहर)