दाखले लवकरात लवकर देण्याची भाजपाची मागणी

By Admin | Updated: May 31, 2014 01:16 IST2014-05-31T00:49:47+5:302014-05-31T01:16:25+5:30

कुडाळ तहसीलदार याच्याकडे निवेदन

BJP's demand to give the proofs as early as possible | दाखले लवकरात लवकर देण्याची भाजपाची मागणी

दाखले लवकरात लवकर देण्याची भाजपाची मागणी

 कुडाळ : जनतेची प्रलंबित असलेली कामे, रेशनिंग कार्ड व विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्यावतीने कुडाळ तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. भाजपाच्यावतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, येत्या काही दिवसात बारावीचा निकाल लागणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शासकीय दाखल्यांची गरज असते. हे दाखले शासनाच्यावतीने वेळीच उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात यावेत. तसेच कुडाळ तालुक्यातील काही रेशनकार्डांची प्रकरणे गेली अनेक महिने प्रलंबित आहेत. याप्रकरणांकडे लक्ष घालून कार्यवाही करावी. दाखले देण्याबाबत नियोजन करण्याबाबतही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, उपजिल्हाप्रमुख राजु राऊळ, नीलेश तेंडुलकर, प्रमोद राऊळ, गजानन वेंगुर्लेकर, अजित राणे, विजय कांबळी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's demand to give the proofs as early as possible