शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:36 IST

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

कणकवली : गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु भाजपानं अद्यापही राणेंच्या अधिकृत प्रवेशासंदर्भात कोणतीही वाच्यता केलेली नाही. त्यातच आता कोकणातील कणकवली या मतदारसंघातून नितेश राणे भाजपाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. मुख्यमंत्री आणि नारायण राणेंची काल रात्री एक बैठक झाली. या बैठकीतच नितेश राणेंना कणकवलीतून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे.सध्या भाजपाकडे माजी आमदार प्रमोद जठार, अतुल रावराणे या जागेचे दावेदार होते. परंतु या दोघांचीही नावं मागे पडत नितेश राणेंना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचं जवळपास समजतं आहे. पक्ष प्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना भाजपा एबी फॉर्म देणार असल्याचीही माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.तसेच नितेश राणेंनीही ट्विट करत आता फक्त काही तास बाकी असल्याचं सूचक विधान केलं आहे. ही तर वादळापूर्वीची शांतता असल्याचंही ते म्हणाले आहेत. कोकण पट्ट्यात भाजपाच्या वाट्याला एकच जागा आली असून तो परंपरागत मतदारसंघ आहे. यापूर्वी गोगटे कुटुंबाकडे आमदारकी राहिली होती. 2009 मध्ये गोगटे यांनी माघार घेतल्याने प्रमोद जठार यांना तिकीट दिले होते. तेव्हा जठार यांनी निसटता विजय मिळविला होता. 

  • शिवसेनेचा विरोध कायम

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाण्याच्या तारखा देत आहेत. परंतु काही झाले तरी त्यांना भाजपात प्रवेश मिळणार नाही, असा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या प्रवेशाचा दावा खोटा ठरला असल्याचं सांगत राणेंना कधीच भाजपात प्रवेश मिळणार नसल्याचं सांगितलं आहे. 

  • नारायण राणेंचा भाजपा प्रवेश अधांतरीचराज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये होणारा प्रवेशही लटकण्याची शक्यता आहे. मी भाजपामध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून त्यांनी मला बोलावलं आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात केला होता. पुढे ते म्हणाले होते की, माझा भाजप प्रवेश आणि मंत्रिपदही ठरले होते. मात्र शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र मी जाणार हे पक्के असल्याचेही स्पष्ट संकेत त्यावेळी राणेंनी दिले होते. परंतु भाजपाकडून अद्यापही राणेंना तारीख पे तारीख दिली जात असल्यानं त्यांच्या पक्ष प्रवेशांची अनेकांना चिंता सतावते आहे.  
टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019