शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:55 IST

शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले

कणकवली: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे नेतृत्व गेली अठावीस वर्षे केले. मात्र, अनेक पदे मिळूनही जिल्हयाचा सर्वांगीण विकास ते करु शकले नाहीत. तर  जनतेसाठी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी आमदार नितेश राणे हे मंत्र्यांना निवेदने देत सुटले आहेत. मात्र, ते कणकवली मतदारसंघात कोणतेही महत्वपूर्ण काम करु शकले नाहीत. असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी केला.कणकवलीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, अ‍ॅड. हर्षद गावडे, वैभव मालंडकर, आदीत्य सापळे, प्रसाद अंधारी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, आमदार नीतेश राणेंची कार्यपध्दती भाजप नेतृत्वाला माहिती असल्याने  त्यांना मंत्री पद दिलेले नाही. फोंडाघाट, करुळ, भुईबावडा या घाट रस्त्यांची  दुरावस्था झाली आहे. ही कामे करुन घेण्याची जबाबदारी आमदार राणेंची होती. मात्र, ते कोणतेही काम करु शकलेले नाहीत. त्यांची जर क्षमता असती तर भाजपने त्यांना मंत्रीपद दिले असते. त्यांची कार्यपध्दती योग्य नसल्याने मूळ भाजप कार्यकर्ते कंटाळले आहेत.हिंदूंच्या संदर्भात आमदार राणे आता भुमिका घेत आहेत, पण त्यांच्या भुमिका कायम बदलत असतात. पक्षाने मुळ भाजपमधील रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले. राणेंचा राजकीय इतिहास सर्वांना माहिती आहे. सत्तेची अनेक पद भोगून झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस या पक्षांवर टीका करत ते पक्षाबाहेर पडले. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले त्यांच्याच विरोधात ते गेले, हे भाजप नेतृत्वाला माहिती आहे. ज्यावेळी शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले आहे. भाजपमध्ये आता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने नवीन प्रस्थ निर्माण झाले आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले पण पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली नाही. आपण थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेलआमदार वैभव नाईक यांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी लावण्यात आली आहे. नाईक कुटूंबिय गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. वैभव नाईकांचे नेतृत्व मोठे झाल्यानेच हे असले प्रकार भाजपकडून सुरु करण्यात आले आहेत. राणें विरुध्द टीकेचा आणि संविधानाचा संबंध काय? असा सवालही पारकर यांनी केला. आता जिल्हयाच्या पालकमंत्री पदी रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी जिल्हा विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, जनतेच्या हितासाठी शिवसेना पुढील काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करु असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा