शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये जि. प. सर्वसाधारण सभेत शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:14 IST

Zp Kankavli Sindhudurg- कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी जिल्हा परिषद अखत्यारितील जागा देण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी सदस्य यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.

ठळक मुद्देभाजप-शिवसेना सदस्यांमध्ये जि. प. सर्वसाधारण सभेत शाब्दिक चकमकशिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागा देण्यावरून वाद

ओरोस : कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी जिल्हा परिषद अखत्यारितील जागा देण्याच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी सदस्य यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.

जिल्हा परिषद मालकीची इमारत निर्लेखित करून स्मारक बांधण्यात यावे, असा शिवसेना सदस्यांनी आग्रह धरला, तर स्मारक बांधण्यासाठी आपला कोणताही विरोध नाही, पण जिल्हा परिषदेची इमारत असल्याने ती इमारत कशाप्रकारे वापरात राहील याबाबत शहानिशा करून स्मारक बांधण्यासाठी जमीन द्यावी, अशी मागणी भाजप सदस्यांनी केली.यावर पुन्हा सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे सभागृहातील वातावरण गरम झाले होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी..च्या घोषणा सभागृहात सुरू झाल्या व सभागृह दणाणून गेले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची खास सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, सदस्य रणजित देसाई, नागेंद्र परब, संतोष साटविलकर, अमरसेन सावंत, प्रदीप नारकर, अंकुश जाधव, संजय आंग्रे, गणेश राणे, अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.२३ गुंठ्यापैकी काही गुंठे जागा महामार्ग चौपदरीकरणात गेली आहे. त्यामुळे आता त्याठिकाणी निश्चित किती गुंठे जागा आहे ते तपासणे आवश्यक आहे. सभागृहात झालेल्या चर्चेअंती जागेची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल पुढील सभेत ठेवण्यात यावा आणि मगच स्मारकाबाबत निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय पुढील सभेपर्यंत लांबला आहे.आमचा महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही : देसाईछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होणार असल्याने ती जागा त्वरित स्मारकासाठी देण्यात यावी यात कोणतेही राजकारण करण्यात येऊ नये, असे शिवसेना सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितले. यावर भाजप सदस्य रणजित देसाई यांनी आमचा महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही. ते व्हावे ही आमचीही इच्छा आहे. पण त्या ठिकाणी असलेली इमारत खरोखरच पाडणे आवश्यक आहे का ? सद्यस्थितीही तेथे किती जागा उपलब्ध आहे याबाबत पाहणी होणे आवश्यक असून, त्यानंतरच यावर प्रशासनाने निर्णय घावा, असे भाजप सदस्य रणजित देसाई यांनी सांगितले. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या शाब्दिक द्वंद्व झाले. ...आणि सभागृह दणाणलेकणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी शिवसेना सदस्य यांच्यावर शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच या स्मारक बांधण्यासाठी जमीन द्यावी की नाही हे प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्यात येईल, असे सभागृहात स्पष्ट झाले. त्यामुळे हा मुद्दा पुढील जिल्हा परिषद सभेसमोर गेला. दरम्यान, सदस्य अंकुश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिल्या. याला सर्वच सदस्यांनी प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराज व भवानी मातेच्या घोषणांनी जिल्हा परिषद सभागृह दणाणून गेले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग