शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भास्करचा सूर्योदय नाही आता सूर्यास्त जवळ आला, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 18:30 IST

नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसतात

कुडाळ : भास्करचा आता सूर्योदय नाही तर सूर्यास्त जवळ आला आहे. तर वैभव नाईक यांचे वैभव जाऊन भाजपचे वैभव कुडाळ विधानसभेमध्ये निश्चितपणे उदयास येईल, असा विश्वास भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कुडाळ येथील संविधान बचाव रॅलीच्या सभेदरम्यान व्यक्त केला.  भाजपाची संविधान समर्थन रॅली शुक्रवारी भाजपा कार्यालय कुडाळ ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी काढण्यात आली. या रॅलीला मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजपा प्रदेश चिटणीस माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, संजू परब, राजू राऊळ, विशाल परब, आनंद शिरवलकर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले, नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काँग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसतात.या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व जनतेने मान्य केले आहे. तर कोकणच्या जनतेने मंत्री नारायण राणेंचे नेतृत्व मानले आहे. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर वेडं-वाकडं बोलाल तर तुम्हाला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी जाधव यांना दिला.आम्ही संविधान घेऊन चालतो. डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला कायद्याचं पालन करायला शिकवलं. त्यामुळे संविधानाचा अपमान, लोकशाहीला तुडविणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. ज्याला ठोकायचा असेल तर ठोकू, असा इशारा दरेकर यांनी दिला.

ताकद दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही : राणेयावेळी माजी खा. नीलेश राणे म्हणाले की, कुडाळमध्ये चार दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी अघोषित मोर्चा काढला. खरंतर चौकशी लावली म्हणून यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी कुडाळात मोर्चा काढण्यात आला. हे उद्धव ठाकरे सरकार नाही, हे शिंदे-फडणवीस यांचे कायद्याचे सरकार आहे. चिपळूणच्या  जाधव यांना एक दिवस तरी आपली ताकद दाखवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.

बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही : प्रसाद लाडयावेळी प्रसाद लाड म्हणाले, भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांचे आयटम गर्ल आहेत. तर वैभव नाईक हे चिंधीचोर आहेत, उदय सामंत यांच्या पाया पडणारे जाधव यांनी आम्हाला शिकवू नये. आमचे नेते राणे यांना जेवणावरून उठविणाऱ्या उद्धव ठाकरे व भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBhaskar Jadhavभास्कर जाधवpravin darekarप्रवीण दरेकर