शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटल्याने फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

By अनंत खं.जाधव | Updated: August 9, 2023 16:50 IST

..त्यामुळे शरद पवारांबद्दल कोणाच्या मनात संभ्रम नाही

सावंतवाडी : महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटला आहे, त्यामुळेच त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचा एकही नेता भाजपकडे जाणार नाही. आता काँग्रेसकडेच सर्वसामान्य जनता आशेचा किरण म्हणून पाहत आहेत असा विश्वास माजी मंत्री, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असले तरी त्याचा मित्रपक्ष भाजपच त्याच्यावर नाराज आहेत. पर्यटनासाठी ते कोल्हापुरात येतात, असे त्यांचे म्हणणे मग त्याच्यावर न बोललेच बरे असे म्हणत पाटील यांनी मंत्री केसरकर यांना चिमटा काढला.आमदार सतेज पाटील हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी राणी पार्वती देवी हायस्कुलमध्ये काँग्रेस पदाधिकार्‍यांशी चर्चा करत कामाचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, रविंद्र म्हापसेकर, राजू मसुरकर, महेंद्र सागेलकर, समीर वंजारी, विभावरी सूकी आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून त्याची मते जाणून घेण्यात येतील आणि तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात येणार आहे. त्यावर ते निर्णय घेतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस संघटना अजूनही बळकट आहे. फक्त त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसचा एकही नेता, आमदार भाजपकडे जाणार नाही महाराष्ट्रात सध्या राजकारणात कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न जनतेला पडला आहे. पण जनतेला काँग्रेस वर पूर्णपणे विश्वास असून त्याचा विश्वास काँग्रेस सार्थकी लावेल. एकही नेता किंवा आमदार भाजपकडे जाणार नसून याची आम्हाला खात्री आहे. मुळातच राज्यातील भाजपकडे जनाधार राहिला नसल्याने 105 आमदार असलेल्या भाजपला 14 मंत्री घेऊन समाधान मानावे लागत असून दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट.शरद पवार इंडिया आघाडी सोबतच अजित पवार यांच्या बरोबर काही आमदार जरी भाजप सोबत गेले असले तरी शरद पवार यांनी इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात संभ्रम नसल्याचे पाटील यांनी सांगितले.काँग्रेसच्या कोणाला ईडीची नोटीस नाहीकाँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला ईडीची नोटीस आली नाही. भाजप सोबत गेलेल्यांना ईडी सीबीआयची नोटीस आली होती का याची माहिती पत्रकारांनीच घ्यावी असेही ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपाlok sabhaलोकसभा