A big crowd to visit devotees at Ganesh Temple in Reddy | रेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

रेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

ठळक मुद्देरेडी येथील गणेश मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीमहाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविक उपस्थित

सावंतवाडी : वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात आज सकाळपासून माघी गणेश जयंतीनिमित्त द्विभुज गणेश दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्यातील भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते.
   
माघी गणेश जयंतीनिमित्त आज सकाळी ६ वाजता गणपतीवर अभिषेक करण्यात आला.सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा सुरू झाली आहे.

दुपारी १२ वाजता आरती,तिर्थप्रसाद आणि महाप्रसाद होणार आहे.सायंकाळी ६ वाजल्यापासून गावातील स्थानिक भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: A big crowd to visit devotees at Ganesh Temple in Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.