भुईबावडा, करुळ घाटात बाजूपट्ट्या खचल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:31 IST2017-10-02T17:28:59+5:302017-10-02T17:31:51+5:30

सह्याद्री पट्ट्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात तीन तर करुळ घाटात एका ठिकाणी रस्त्याची बाजूपट्टी खचून संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा घाटात सद्या तीन ठिकाणांवरुन एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे.

Bhuibawada, collapsed in coral ghat | भुईबावडा, करुळ घाटात बाजूपट्ट्या खचल्या

अतिवृष्टीमुळे करुळ घाटाच्या मध्यावरील विश्रांती स्थळानजिक रस्त्याची बाजूपट्टी खचून अगदी रस्त्यालगतच भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देभगदाडं पडून रस्ता खचण्याची शक्यतादोन्ही घाटमार्गांची सुरक्षितता धोक्यातसंरक्षण भिंतीही ढासळू लागल्या करुळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग तासभर बंद

वैभववाडी, 2 :सह्याद्री पट्ट्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात तीन तर करुळ घाटात एका ठिकाणी रस्त्याची बाजूपट्टी खचून संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा घाटात सद्या तीन ठिकाणांवरुन एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे.

बाजूपट्ट्या खचलेल्या ठिकाणी भगदाडं पडून अतिवृष्टीत रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दोन्ही घाटमार्गांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

      करुळ आणि भुईबावडा घाटांच्या परिसरात गेला आठवडाभर दररोज दुपारनंतर ढगफूटी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका दोन्ही घाटमार्गांना बसत आहे. आठवडाभरात दोन्ही घाटात चारवेळा दरडी कोसळून वाहतूक टप्प झाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून करुळ आणि भुईबावडा हे दोन्ही घाटमार्ग तासभर बंद होते.

     रविवारच्या अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात तीन ठिकाणी रस्त्याच्या बाजूपट्या खचून संरक्षण भिंतीही खचल्या आहेत. तसेच करुळ घाटाच्या मध्यावरील विश्रांती स्थळानजिक रस्त्याची बाजूपट्टी खचून अगदी रस्त्यालगतच भगदाड पडले आहे. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हे भगदाड अपघातास कारणीभूत ठरणार आहे. दोन्ही घाटातील गटारे मोकळी नसल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने रस्त्यावरुन वाहतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाच्या तीव्रतेने घाटातील रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचून संरक्षण भिंतीही ढासळू लागल्या आहेत.

     रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात दोन्ही घाटमार्गांच्या बाजूपट्ट्या खचून रस्त्यालगत भगदाडं पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घाटमार्गांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेला आठवडाभर सह्याद्री पट्ट्यात वाढलेला पावसाचा जोर आणखीन काही दिवस कायम राहिला तर पावसाच्या कालावधीत दोन्ही घाटातून प्रवास करणे जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Bhuibawada, collapsed in coral ghat