शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा पोहोचले सातासमुद्रापार...

By admin | Updated: September 30, 2015 00:10 IST

खेडच्या तरूणांचा आदर्श : ओमानमध्ये साजरा झाला गणेशोत्सव

खेड : ओमान देशात काम करणारे खेड तालुक्यातील २५ तरुण गणेशोत्सव साजरा करीत आहेत. कामानिमित्त ओमानमध्ये राहत असलेल्या या तरूणांचा आदर्श तालुक्यातील स्थानिक तरूणांना आदर्शवत तर आहेच, शिवाय कोकणातील गणेशोत्सवाचा हा आदर्श सातासमुद्रापार असलेल्या अनेक कोकणवासीयांनी घेतला आहे. अनंत चतुर्दशी दिनी या गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्याचे या तरुणांनी ओमानमधून सांगितले आहे.‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात कोकणातील बाप्पांच्या या भक्तांना गणपतीचे किती आकर्षण आहे, हे सांगण्याची गरज नाही. तसे ते सलग १० दिवस या बाप्पांचा पाहुणचार करीत असतात. कोकणवासीयांचे या बाप्पांवरील प्रेम आणि भक्ती अवघ्या गणेशभक्तांना भुरळ घालते. आबालवृध्दांसह लाखो भक्तगण या गणेशाच्या आगमनाचे स्वागत करतात, तसे ते निरोपाचेही स्वागत करतात. कोकणातील श्री गणेशाचे पूजन करतानाच्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे अनमोल दर्शन ओमान देशातही घडले आहे. तरुणांच्या या आगळ्यावेगळ्या संस्कारांचे म्हणून कोकणवासीयांना आकर्षण आहे. दापोली तालुक्यातील माळण गावचे अनंत नाडुरकर, प्रकाश म्हापलकर (करंजाळी ता. दापोली), हरिश्चंद्र मुंडेकर (सोगनाव, ता. खेड), प्रवीण निवळकर (संगलट, ता. खेड), मनोहर नाचरे (भडवळे, ता. खेड), संदीप पावसकर (भडवळे, ता. खेड), समीर उदेग (शिव, ता. खेड), सुनील भुवड (सवणस, ता. खेड), सुरेश कोकाटे आणि प्रमोद जगदाळे (नांदगाव, ता़ खेड), भागोजी रांगले (सवणस, ता. खेड), मोहन अांब्रे (गुणदे, ता. खेड), दशराथ मालप (अणसपुरे, ता. खेड) आणि विलास नाचरे (पोफळवणे, ता. खेड) हे सर्व तरूण ओमान येथील अल तुर्की कंपनीत काम करीत आहेत. नवतरूण मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ओमान अल तुर्की कंपनी असे या गणेशोत्सवाचे नाव आहे. गेली २० वर्षे हे लोक ओमानमध्ये काम करीत आहेत. मात्र, कोकणातील श्री गणेशोत्सवाला सर्वांनाच गावाला येण्याची संधी मिळत नसल्याने तेथेच एक छोटेसे मंडळ स्थापन करून गेल्या १0 वर्षांपासून ओमानमध्ये ते राहत असलेल्या घरामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करीत आहेत. सातासमुद्रापार हा उत्सव साजरा करणे जेवढे कठीण आहे. तेवढ्याच श्रध्देने आणि भक्तीने गणेशाचे मनोभावे पूजन केल्यास गणेशदेखील त्यामध्ये येणारे प्रत्येक विघ्न दूर करतो. याचा अनुभव या तरूणांनी ओमान देशात घेतला आहे. त्यांच्या या वैविध्यपूर्ण कार्याने कोकणवासीयांची मान अभिमानाने उंचावते हेदेखील तितकेच खरे आहे. (प्रतिनिधी)कोकणातील गणेशोत्सवाचा आदर्श ओमानमध्ये.संस्कृती आणि संस्कारांचे अनमोल दर्शन.दापोली, खेडमधील तरूणांचा सहभाग.सलग १० दिवस बाप्पांचा पाहुणचार.