शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

बांदा, दोडामार्गला वळवाचा दणका

By admin | Updated: May 17, 2015 01:37 IST

वीज कोसळुन एक ठार : मायलेकी बचावल्या; सावंतवाडीतही पाऊस; झाडे कोसळल्याने महामार्ग ठप्प

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गला वळीव पावसाने शनिवारी चांगलेच झोडपले असून, याचा सर्वाधिक फटका बांदा व दोडामार्गला बसला. बांदा पानवलमध्ये काजू बागायतीत काम करणाऱ्या कामगारावर वीज कोसळली. यात जानू वाघू वरक (वय ३५, रा. रांगणा-तुळसुली, ता. कुडाळ) हा कामगार जागीच ठार झाला, तर दोडामार्ग-झरेबांबर येथे तुकाराम गवस यांच्या घरावर विजेचा लोळ कोसळला. यात मायलेकी थोडक्यात बचावल्या. मात्र, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सावंतवाडीलाही पावसाने दणका दिला आहे. महामार्गावर ओरोस येथे झाडे पडल्याने सुमारे तासभर महामार्ग ठप्प होता. शनिवारी दुपारपासूनच काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात विजेचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्याने सर्वांच्याच मनात भीतीचे सावट निर्माण झाले. बांदा-पानवल येथील काजू बागायतदार राजाराम मावळणकर यांच्या काजू बागायतीत कामगार नेहमीप्रमाणे काजू गोळा करण्याचे काम करीत होते. मुसळधार पाऊस असल्याने कामगारांना शेतमांगरात परतणे शक्य झाले नाही. जानू वरक यांच्यासह कामगारांनी काजूच्या झाडांचा आसरा घेतला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जानू वरक यांच्या अंगावर अचानक विजेचा लोळ कोसळल्याने त्यांचा भाजून जागीच मृत्यू झाला. तेथील कामगारांनी त्यांना तातडीने सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. जानू वरक हे काजू बागायतदार राजाराम मावळणकर यांच्याकडे गेली १२ वर्षे काम करीत होते. त्यांच्या अपघाती निधनाने मावळणकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. जानू वरक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची बांदा पोलिसांत उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती. सावंतवाडीसह कणकवलीत जोरदार पाऊस शहरात वादळी पावसाने शनिवारी दुपारी अचानक हजेरी लावली. सलग अर्धा तास पावसाने सावंतवाडी शहराला झोडपून काढले. पावसामुळे कोणतीही हानी झाली नाही. शनिवारी सकाळपासून पडलेल्या कडक उन्हामध्ये पावसाची कोणतीही शक्यता नसताना दुपारी अचानक पावसाने सावंतवाडी शहरात जोर धरला. यामध्ये परिसरातील कोलगाव, माजगाव, मळगाव, आदी भागाला पावसाने झोडपून काढले. दरम्यान, पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. अचानक आलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वारांची तारांबळ उडाली. कणकवली तालुक्यातही दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला. सुमारे तासभर पाऊस कोसळत होता. तालुक्यात नुकसानीचे वृत्त नाही. वैभववाडी परिसरात गडगडाटासह ढगाळ वातावरण राहिले. उंबर्डे परिसराला दिवसभरात दोनदा पावसाने झोडपले. लोरे, आचिर्णे, नाधवडे परिसरात विजांच्या गडगडाटासह दमदार पाऊस झाला. कुडाळ ते ओरोस परिसरात ठिकठिकाणी महामार्गावर झाडे-फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. (वार्ताहर)ं