सावंतवाडी : सावंतवाडी रामेश्वर प्लाझा जवळील कॉलेज मार्गावर असलेले गौरव जाधव यांच्या ह्यजस्ट बेकह्ण बेकरीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. लागलीच धावाधाव करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. बाजूला थंड पेयांचा बॉक्स ठेवण्यात आला होता. त्या बॉक्सलाच आग लागल्याचे सांगण्यात आले.सावंतवाडी शहरातील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मार्गावर चार ते पाच स्टॉल असून यातून कॉलेजच्या बाजूच्या स्टॉलला आग लागली. ही आग सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लागल्याने परिसरात नागरिक होते त्यांनी धावाधाव करत ही आग आटोक्यात आणली. ही आग थंड पेयांच्या बॉक्सला लागल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक लागलेल्या आगीने चांगलीच खळबळ उडाली, मात्र अग्निशामक बंब तत्काळ दाखल झाला आणि आग आटोक्यात आणली.दुकान मालक गौरव जाधव, आनंद गावकर यांना समजताच त्यांनी लागलीच नगरपालिकेचा बंब बोलवला होता. शेजारील संजय नाईक व अन्य दुकान चालकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग थंड पंयाच्या बॉक्सला कशी काय लागली हे नेमके समजले नाही. दुकानातील सामान सुरक्षित राहिले.
सावंतवाडीत बेकरीला आग; सामान खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:30 IST
Sawatnwadi Fire Sindhudurg- सावंतवाडी रामेश्वर प्लाझा जवळील कॉलेज मार्गावर असलेले गौरव जाधव यांच्या ह्यजस्ट बेकह्ण बेकरीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. लागलीच धावाधाव करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. बाजूला थंड पेयांचा बॉक्स ठेवण्यात आला होता. त्या बॉक्सलाच आग लागल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडीत बेकरीला आग; सामान खाक
ठळक मुद्देसावंतवाडीत बेकरीला आग; सामान खाक कारण अस्पष्ट : मोठा अनर्थ टळला