पार्श्वनाथ बँक अफरातफर प्रकरणी कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापकाला जामीन
By सुधीर राणे | Updated: September 17, 2022 15:53 IST2022-09-17T15:52:51+5:302022-09-17T15:53:16+5:30
कणकवली: पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक किशोर गुंजिकर याची कर्जदाराच्या ८० लाख रुपयांची अकरातफर व फसवणूक प्रकरणी जिल्हा ...

पार्श्वनाथ बँक अफरातफर प्रकरणी कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापकाला जामीन
कणकवली: पार्श्वनाथ को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक किशोर गुंजिकर याची कर्जदाराच्या ८० लाख रुपयांची अकरातफर व फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.
किशोर गुंजिकर याने पार्श्वनाथ को -ऑपरेटिव्ह बँकेच्या कणकवली शाखेत व्यवस्थापकपदी कार्यरत असताना स्वतः तसेच रोखपाल अनुश्री गावडे, कर्जदार अशोक सावंत यांनी संगनमताने सहकर्जदार प्रेमानंद सावंत याची फसवणूक केल्याची तक्रार शासकीय लेखापाल सच्चीदानंद पैलवान यांनी दिली होती. त्यानुसार भा.दं. वि.४०९,४२०,४६७,४६८,४७१व ३४ नुसार गुन्हा दाखल होऊन किशोर गुंजिकर व अशोक सावंत यांना एप्रिल २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती.
आरोपी गुंजिकरच्या वतीने अॅड.विलास परब व अॅड. तुषार परब यांनी जामीनावर मुक्तता करण्याबाबत केलेला युक्तिवाद जिल्हा न्यायालयाने ग्राह्य मानला. तसेच किशोर गुंजिकर याला २५ हजार रुपये रक्कमेचा जामीन मंजूर केला आहे.