फोंडाघाट - घाटातील मोठ्या तीव्र वळणावर ट्रकचा एक्सेल तुटला अन् अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ट्रक रस्त्या लगतच्या संरक्षक कटड्यावर जाऊन जोरात धडकल्याने मोठा अनर्थ टळला. त्यादरम्यान कोल्हापूरकडे जाणारा ट्रेलर साईड घेताना गटारात रुतून पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.काल रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पाऊस-वाऱ्यामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. पीडब्ल्यूडीचे कर्मचारी शाहू- शेळके तातडीने घटनास्थळी पोहचले. यानंतर त्यांनी एका खासगी जेसीबीच्या सहाय्याने भर पावसात ट्रेलर बाजूला करण्यात यश मिळवले. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली.अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने घाट मार्गावर वाहनधारकांनी वाहने सावकाश चालवावीत. पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याची शक्यता दाट असते.
फोंडा घाटात तीव्र वळणावर ट्रकचा एक्सेल तुटला, अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 16:51 IST