शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सलग चौथ्या वर्षी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:52 PM

Banking Sector Sindhudurg- अविज पब्लिकेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत सहकार क्षेत्रात देशपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा बँको ब्ल्यू रिबन २०२० पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर झाला आहे. सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार बँकेला मिळाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सलग चौथ्या वर्षी पुरस्कार सतीश सावंत यांची माहिती : बँको ब्ल्यू रिबन २०२० ने सन्मान

ओरोस : अविज पब्लिकेशन कोल्हापूर या संस्थेमार्फत सहकार क्षेत्रात देशपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा बँको ब्ल्यू रिबन २०२० पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जाहीर झाला आहे. सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार बँकेला मिळाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत दिली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळालेल्या पुरस्काराची माहिती देण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक व्हिक्टर डान्टस, निता राणे, बँकेचे सीईओ अनिरुद्ध देसाई, आदी उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून १९९९ पासून कामकाज करीत असून, या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पद्धती, सहकार क्षेत्रातील कायदे कानून व त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची अद्ययावत माहिती संकलन व प्रसिद्धीचे कामकाज केले जाते.

या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बँकिंग कामकाज करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात. बँकेने आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन केल्याने त्याचप्रमाणे स्वमालकीचे डाटा सेंटर उभारून सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गटातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला बँको ब्ल्यू रिबन २०२० पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा मार्च २०२१ मध्ये म्हैसूर कर्नाटक येथे होणार आहे, असेही सावंत म्हणाले.बँकेचे कामकाज अव्वल ठेवण्याचा प्रयत्नया पुरस्काराबद्दल सतीश सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून, या पुरस्काराचे श्रेय त्यांनी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व ग्राहक यांना दिलेले आहे. तसेच भविष्यात जिल्हा बँकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देऊन बँकेच्या आपली माणसं आपली बँक या ब्रीद वाक्याप्रमाणे बँकेचे कामकाज यापुढेही सातत्याने चालू राहील, अशी ग्वाही सतीश सावंत यांनी दिली.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग