शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील शिवसैनिकावरील हल्लाप्रकरण; आणखी एकाला अटक! तपासाबाबत पोलीसांकडून कमालीची गुप्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 00:31 IST

कणकवली न्यायालयात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता संबधित गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले.

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख, मजूर संस्था संचालक तथा करंजचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी त्याच दिवशी चार व नव्याने अटक केलेला एक, अशा ५ आरोपींना गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.  त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी नरडवे नाका तसेच न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

कणकवली न्यायालयात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता संबधित गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. ४ वाजण्याच्या सुमारास न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता सरकारी पक्षातर्फे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. संबधित आरोपी सराईत आहेत. तसेच या गुन्ह्यात अन्यही काही आरोपींचा हात आहे. 

तपासात निष्पन्न झालेल्या अन्य दोन आरोपींना अटक करायची आहे. त्यामुळे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली होती. यावर आरोपींच्यावतीने वकिलांनी, तपास करण्यासाठी यापूर्वी ५ दिवसांची कोठडी दिली होती. त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडीत वाढ करु नये, असे म्हणणे मांडले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर  कणकवली न्यायालयाने पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना २५ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

कणकवली दिवाणी न्यायालयात गुरुवारी या संशयित आरोपींना हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कणकवलीमध्ये दंगल नियंत्रण पथक व आर. सी. पी. पथक कणकवली दिवाणी न्यायालयालगत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, पोलिसांनी अजूनही आरोपींची नावे उघड केलेली नाहीत. त्यांची ओळख लपविली जात आहे.प्रसिद्धिमाध्यमानाही माहिती दिली जात नसल्याने या गुन्हयामागचे गूढ आणखीन वाढतच आहे.    संतोष परब यांना कोल्हापूर येथील रुग्णालयातून गुरुवारी डिस्चार्ज मिळाल्याने त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात अधिक चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी त्यांच्याकडून अधिक माहीती जाणून घेतली.  

टॅग्स :KankavliकणकवलीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी