शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मिनीमहाबळेश्वरमधील वातावरण तापले

By admin | Updated: April 14, 2015 01:10 IST

कडकडीत उन्हाने

शिवाजी गोरे ल्ल दापोली एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटीशांनी मिनी महाबळेश्वरात आपल्या सैनिकी छावण्या थाटल्या होत्या. कधी काळी ब्रिटीशांना खूप भावलेले मिनीमहाबळेश्वर दापोली अलीकडे कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे मिनी महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणाला सुद्धा जोरदार फटका बसायला सुरुवात झाली असून मिनीमहाबळेश्वर प्रचंड तापले आहे. दापोलीच्या मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर कोकणच्या निसर्गसौंदर्याने ब्रिटीशांना तर चांगलीच भुरळ घातली होती. त्यामुळे महाबळेश्वर पाठोपाठ ब्रिटीशांनी दापोलीला पसंती दिली. थंड हवा लागूनच असलेला अरबी समुद्र यामुळे समुद्रमार्गे दळणवळणसुद्धा ब्रिटीशांना सोईची होती. समुद्रमार्गे जहाजाने हर्णेला जायचे व हर्णेतून दापोलीला बग्गी/घोडागाडीतून प्रवास करुन थंड हवेच्या ठिकाणी तळ ठोकायचा. दापोलीचे निसर्गसौंदर्य, थंड हवा, शांत समुद्रकिनारा ब्रिटीशांना भावल्याने दापोली मिनीमहाबळेश्वरला छावणीचे रुप आले होते. दापोलीतील आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरात ब्रिटीश सैन्य व अधिकाऱ्यांच्या छावण्या होत्या. त्यामुळे याच मिनी महाबळेश्वरचे नाव कधीकाळी कॅम्प दापोली म्हणूनसुद्धा प्रचलित होते. ब्रिटीश काळात दापोली शहर नगरपालिकेचे शहर होते. पूर्वीच्या काळी दापोलीत नगरपालिका अस्तित्वात होती. अशी ही वैभवसंपन्न दापोली अनेकांना प्राचीन काळापासून आपल्या निसर्गसौंदर्यामुळे भावली आहे. कोकणातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोली मिनीमहाबळेश्वर सर्वाधिक पसंती मिळू लागल्याने अनेकांनी दापोलीत जमीन-जागा खरेदी करायला सुरुवात केली व खऱ्या अर्थाने दापोलीच्या निसर्गसौंदर्यावर कुऱ्हाड कोसळायला सुरुवात झाली. दापोलीत अलीकडे मोठ्या प्रमाणावर जागा-जमिनींचे व्यवहार झाले व धनिक लोकांनी दापोली मिनीमहाबळेश्वरच्या जमिनीला सर्वाधिक पसंती दिल्यानंतर निसर्गसौंदर्याने नटलेले डोंगर, उघडे बोडके होवू लागले. जमिनी धनिकांनी खरेदी केल्यामुळे नैसर्गिक जंगलाची वृक्षतोड होवून मोठ्या प्रमाणावर आता गावागावात सिमेंटचे जंगल निर्माण होवू लागले आहेत. सिमेंटच्या जंगलामुळे व प्रचंड जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला असून मिनीमहाबळेश्वर तापू लागले आहे. दापोलीचे निसर्गसौंदर्य नष्ट होवू लागल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. दापोली मिनीमहाबळेश्वरची धनिकांना भुरळ पडत असल्याने अनेकांनी येथील समुद्रकिनाऱ्यावर सिमेंटचे जंगल उभे केले आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले थंड हवेचे डोंगर नष्ट होत असून, डोंगर पोखरुन सिमेंटच्या बंगल्यांची संख्या वाढत आहे. थंड हवेचे ठिकाण मिनीमहाबळेश्वरची भुरळ असल्याने अनेकांनी जमिनी खरेदी करुन नैसर्गिक सौंदर्य नष्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मिनीमहाबळेश्वरचे पर्यावरण संतुलन ढासळले असून, येथील थंड हवेच्या ठिकाणाचे तापमान आता ४० अंश डिग्रीच्या जवळपास जाऊन पोहोचल्याने पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करु लागले आहेत.