शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविका, कर्मचाऱ्यांना २०१९ मधील पल्स पोलिओ मोहिमेचे मानधन अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:18 IST

Zp Health News- जानेवारी २०१९ मधील महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत आशा सेविकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना पल्स पोलिओ मोहिमेचे काम करूनही आजतागत एकही रुपया मानधन अजूनही खात्यावर जमा झालेला नाही. हा हलगर्जीपणा आम्ही खपवून घेणार नाही. लवकरात लवकर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा असा इशारा लॉरेन्स मान्यकर यांनी आरोग्य समिती सभेत केला .

ठळक मुद्देआशा सेविका, कर्मचाऱ्यांना २०१९ मधील पल्स पोलिओ मोहिमेचे मानधन अद्याप नाहीलॉरेन्स मान्येकर यांनी आरोग्य समिती सभेत उपस्थित केला प्रश्न

ओरोस : जानेवारी २०१९ मधील महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत आशा सेविकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना पल्स पोलिओ मोहिमेचे काम करूनही आजतागत एकही रुपया मानधन अजूनही खात्यावर जमा झालेला नाही. हा हलगर्जीपणा आम्ही खपवून घेणार नाही. लवकरात लवकर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा असा इशारा लॉरेन्स मान्यकर यांनी आरोग्य समिती सभेत केला .आरोग्य समिती सभा सभापती सावी ओके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, सदस्य प्रितेश राऊळ, लॉरेन्स मान्यकर हरी खोबरेकर आदीसह खातेप्रमुख उपस्थित होते.महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या २०१९ च्या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र आज अखेर त्यांचे पगार (मानधन) त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. असे मान्येकर म्हणाले. आता दुसरे वर्षे जानेवारी २०२१ ची पल्स पोलिओ मोहीम काही दिवसात येणार आहे. तीचे तरी मानधन वेळेवर मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला असता, डॉ. खलिपे म्हणाले, पेमेंट स्लिपवर खराबी झाल्यामुळे त्यांचे पगार तसेच राहिल्याने आता हे पगार या डिसेंबर व जानेवारी २०२१ या महिन्यात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

क्लार्कच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या खात्यावर पैसेच जमा झाले नाही. हे पगार अडकून राहिले.जिल्ह्यातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या एनआर एचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना २०१८ सालापासून वेतन मिळालेले नाही. त्यातील पगाराचा फरकातील तफावत दूर करून त्यांचे वेतन देण्यात यावे अशी मागणी मान्येकर यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी खलीपे यांनी वेतन हे डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत अदा करण्यात येईल. असे स्पष्ट केले.मास्क, सॅनिटायझर, ॲम्बुलन्सवरून जोरदार चर्चाजिल्ह्यात मास्क व सॅनिटायझरची अजूनही गरज आहे. तरी आमच्या मालवण तालुक्यात त्याचे जास्तीत जास्त वाटप होणे गरजेचे आहे. अशी मागणी सदस्य हरी खोबरेकर यांनी केली. यावर सदस्य प्रितेश राऊळ म्हणाले, अनेक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरमध्ये भ्रष्टाचार होत आहे ते विकत घेऊ नये. आपल्या जिल्हाचे नाव खराब होईल. आम्हाला पाच वर्षे झाली आम्ही एक- एक ॲम्बुलन्सची मागणी करत आहोत . ती गरजेची मागणी आहे . लवकरात लवकर देण्यात यावी. यावर समिती सभापती सावी लोके व सदस्यांच्या आपापसात जोरदार चर्चा रंगली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्गHealthआरोग्य