शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्याची अरुणा प्रकल्पस्थळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:08 IST

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांनी अरुणा प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त प्रकल्पग्रस्तांनी त्यांची भेट घेत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्याची अरुणा प्रकल्पस्थळी भेटसंतप्त प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची केली मागणी

वैभववाडी : जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांनी अरुणा प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त प्रकल्पग्रस्तांनी त्यांची भेट घेत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर धरणाच्या पाण्यात काही प्रकल्पग्रस्तांची घरे बुडाली. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच प्रकल्पग्रस्तांना २३ मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त विविध प्रकारे जूनपासून संघर्ष करीत आहेत.

गेल्या महिन्याभरात प्रकल्पग्रस्तांनी सातत्याने दे धडक, बेधडक आंदोलन, मुंडण आंदोलन, श्राद्ध आंदोलन, घेराओ अशाप्रकारच्या आंदोलनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद प्रकल्पग्रस्तांना मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धरणाचे कोणतेही काम यापुढे होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा संघर्ष करावा लागला तरी त्यांची तयारी त्यांनी केली आहे.दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा दौऱ्यावर असलेले जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तिरमनवार यांची अरुणा प्रकल्पस्थळी भेट घेतली. तत्पूर्वी प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण काहीसे तापले होते. मुख्य अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांना बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपण सूचना करूनदेखील अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक का बोलविली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू नये अशी मागणीदेखील प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केली.

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग