शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

बंदर विकास कार्यक्रम : पावसाळी हंगामानंतर कामाला सुरुवात ; प्रस्तावित जागेची पाहणी

मालवण : बंदर विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ तून मालवण तालुक्यातील बंदरांचा विकास करण्यासाठी १ कोटी ५५ लाख किंमतीची सात विविध कामे प्रस्तावित आली आहेत. मच्छिमार व स्थानिक यांनी सूचित केलेल्या या कामांची जागा निश्चिती व पाहणी मंगळवारी बंदर, पत्तन व मत्स्य अधिकारी तसेच जिल्हा दक्षता समितीचे सदस्य व मच्छिमार प्रतिनिधी हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. संबंधित विभागाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र व विविध परवानगीची पूर्तता करून पावसाळी हंगामानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामांची पाहणी व जागा निश्चिती मंगळवारी करण्यात आली. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त व्ही. बी. कांबळे, मत्स्य अधिकारी मालवणकर, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, पत्तन विभागाचे कनिष्ठ अभियंता बोधिकर यांच्यासह मच्छिमार प्रतिनिधी हरी खोबरेकर, नरेश हुले, जेम्स डायस तसेच महिला मच्छिमार व अन्य उपस्थित होते. मच्छिमारांना विश्वासात घेऊनच ही जागा निश्चिती करण्यात आली आहे, असे सांगताना हरी खोबरेकर यांनी महिला मच्छिमार मत्स्य व्यावसायिक या सर्वांना विचारात घेऊनच मंजूर झालेली कामे पूर्ण करून घेतली जातील असे सांगितले. (प्रतिनिधी)मासळी सुकवण्याचा चौथरा बांधणारमालवण पालिका मासळी मार्केटजवळ मासळी सुकवण्याचा चौथरा बांधणे २५ लाख रुपये, मच्छिमार्केट निवारा शेड उभारणी २५ लाख, मच्छिमार्केटजवळ लिलावगृह २५ लाख, मच्छिमार्केट जवळ स्लोपिंग रँप २५ लाख, दांडी आवार येथे मासळी लिलावासाठी चौथरा उभारणे २५ लाख, निवारा शेड २५ लाख तसेच सर्जेकोट बंदरात मार्गदर्शक दिवे बसविणे ५ लाख रुपये अशी १ कोटी ५५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली.