डीएलडी प्रवेशासाठी १ जूनपासून अर्जविक्री
By Admin | Updated: May 29, 2015 23:45 IST2015-05-29T22:24:40+5:302015-05-29T23:45:30+5:30
सहा केंद्रे : जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेची माहिती

डीएलडी प्रवेशासाठी १ जूनपासून अर्जविक्री
कुडाळ : प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलडी) प्रवेशासाठी अर्जविक्री १ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर होणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षासाठी प्राथमिक शिक्षण पदविका (ऊ्रस्र’ङ्में ्रल्ल ए’ीेील्ल३ं१८ ए४िूं३्रङ्मल्ल) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी आवेदन पत्राची विक्री १ ते १५ जून या कालावधीत होणार आहे. तसेच २ ते १६ जून या कालावधीत आवेदन पत्राची स्वीकृती होणार आहे. आवेदन पत्राची विक्री व स्वीकृती प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग नवनगर वसाहत, जिजामाता सर्कलजवळ, कृषिरत्न कॉम्प्लेक्स समोर, सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण ता. मालवण, के. एम. एस. अध्यापक विद्यालय मिठबाव ता. देवगड, विद्याविकास अध्यापक विद्यालय आजगाव ता. सावंतवाडी, बॅ. नाथ पै अध्यापक विद्यालय कुडाळ व के. बी. सावंत कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय डिगस ता. कुडाळ या सहा केंद्रांवर होणार आहे. विक्री व स्वीकृती सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुटीच्या दिवशीही सुरू राहील. मागासवर्गीय उमेदवाराने आवेदनपत्र घेताना जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे. शासनमान्य अध्यापक विद्यालयाची यादी व परिशिष्टे ६६६.े२ूी१३.ङ्म१ॅ.ल्ली३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एकूण प्रवेश क्षमतेपैकी ७० टक्के प्रवेश विभागस्तरावरून व ३० टक्के प्रवेश राज्यस्तरावरून करण्यात येतील. प्रवेशास इच्छुक कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार १२ वीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण, तर मागासवर्गीय उमेदवार किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे प्राचार्य, डायट, सिंधुदुर्ग यांनी पत्रकात म्हटले
आहे. (प्रतिनिधी)
नोकरीची खात्री नाही
राज्यात २ मे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) झालेली नाही. तसेच सन २०१३ मधील शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) ५,९१,९९० आणि सन २०१४ च्या शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) ३,८८,६९९ इतके विद्यार्थी बसले होते. ही वस्तुस्थिती पाहता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे पत्रकात म्हटले आहे.