Sindhudurg: नवीन नंबर प्लेट बसवा, अन्यथा 'आरटीओ'त कामे होणार नाहीत; वाहनमालकांना इशारा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:22 IST2025-06-10T19:21:50+5:302025-06-10T19:22:13+5:30

आरटीओचा वाहनमालकांना इशारा 

Any work on vehicles will be done only if they have HSRP number plates | Sindhudurg: नवीन नंबर प्लेट बसवा, अन्यथा 'आरटीओ'त कामे होणार नाहीत; वाहनमालकांना इशारा

संग्रहित छाया

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित सर्व जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एसएसआरपी) बसविण्याचा निर्णय घेतला असून ३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर फ्लेट बसविण्यास मुदत देण्यात आली आहे. मात्र, १६ जूनपासून आरटीओ कार्यालयात आलेल्या वाहनांचे कोणतेही काम एचएसआरपी नंबर प्लेट असेल तरच होणार आहे.

नंबर प्लेट नसेल तर काम केले जाणार नसल्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिला आहे. जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वारंवार आवाहन करूनदेखील वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरटीओने ही भूमिका घेतली आहे.

ही कामे करायची तर हायसिक्युरिटी नंबर प्लेट हवी

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे आदी कामकाज एचएसआरपी नंबर प्लेट बसविल्याशिवाय १६ जूनपासून होणार नाही.

नोंदणी केल्यास मिळणार सवलत

वाहन मालकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास कामकाज करून दिले जाणार आहे.

३० जूनपर्यंत अंतिम मुदत

वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत असून अद्याप ज्या वाहन धारकांकडे जुन्याच नंबर प्लेट असतील त्यांनी त्या त्वरित बसवून घ्याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

हायसिक्युरिटी नंबर प्लेटसाठी जिल्ह्यात २० हजार वाहनांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. यापैकी सुमारे १० हजार वाहनांनी प्लेट बसविण्यात आलेल्या आहेत. उर्वरित वाहनधारकांनी तातडीने ही नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई टाळावी. - विजय काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग.

Web Title: Any work on vehicles will be done only if they have HSRP number plates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.