शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 14:58 IST

Vengurle Police Station, sindhudurg, state transport, bjp, महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सांगत या सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भाजपा वेंगुर्लाच्यावतीने एसटी आगाराच्या बाहेर मंगळवारी सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देवेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने सरकारविरोधात आंदोलनभाजपा कर्मचाऱ्यांच्या पाठीशी

वेंगुर्ला : महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सांगत या सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भाजपा वेंगुर्लाच्यावतीने एसटी आगाराच्या बाहेर मंगळवारी सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी व रत्नागिरी आगाराचे चालक पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केली. हे लोण पसरू नये यासाठी राज्य सरकारला वेळीच वठणीवर आणण्याची गरज आहे.थकीत वेतनामुळे हजारो एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले असल्याचे सांगत हे आंदोलन छेडण्यात आले. वेंगुर्ला आगाराच्या बाहेर काळे झेंडे घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालाच पाहिजे, एसटी महामंडळ डबघाईस आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ठाकरे सरकारचा निषेध असोअशा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, एसटी कामगारांचे नेते प्रकाश रेगे, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, ज्येष्ठ नेते बाळा सावंत, मच्छिमार नेते वसंत तांडेल, तालुका चिटणीस जयंत मोंडकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, अमेय धुरी, निलय नाईक, श्रीकृष्ण हळदणकर, राहुल मोर्डेकर उपस्थित होते.कर्मचाऱ्यांच्या पाठीशीकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे जायचे हा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या घरात ऐन दिवाळीत अंधार करणाऱ्या या अपयशी ठाकरे सरकारच्या विरोधात ऐन दिवाळीतच आंदोलनाचा जाळ काढण्याची वेळ जनतेवर आली असून भारतीय जनता पार्टी भक्कमपणे या सर्व अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील, असे जिल्हा सरचिटणीस देसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गstate transportएसटी