शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

 सावंतवाडी तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर, मळगाव धबधब्याला मिळाली चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:42 IST

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील मळगाव घाटीतील धबधब्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडणार आहे.

ठळक मुद्दे सावंतवाडी तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर, मळगाव धबधब्याला मिळाली चालनाकाम लवकर पूर्ण करणार : समाधान चव्हाण, उपवनसंरक्षकपालकमंत्री केसरकर यांच्या सहकार्याने धबधब्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप

रामचंद्र कुडाळकर 

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील मळगाव घाटीतील धबधब्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी एका पर्यटनस्थळाची भर पडणार आहे.

मळगाव ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून वनखात्याकडे पाठपुरावा करून हा धबधबा विकसित होत आहे. मळगाव वनसमिती अध्यक्ष गणेश पेडणेकर, गजानन सातार्डेकर व सर्व वनसमिती सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न मिटला आहे. मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी ३ लाखांपर्यंत निधी खर्च करून पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभिकरणाचे काम होणार आहे.

या पर्यटनस्थळामुळे सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील पर्यटनात वाढ होणार आहे. त्यादृष्टीने सावंतवाडी वनखात्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत मळगाव हद्दीत वनखात्याअंतर्गत चिटणीस बंधारा बांधण्यात आला आहे. यातून वनखातेही जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते.

पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक पर्यटनात्मक बदल होत आहेत. या विकासात्मक कामांची पूर्तता वेळीच होणे गरजेचे आहे. एखादे विकासात्मक काम निधीअभावी रखडता नये.

ठेकेदाराने आपले काम उत्कृष्ट दर्जाचे आणि वेळेत पूर्ण करावे. तरच तो उपक्रम यशस्वीरित्या मार्गी लागू शकतो, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे मळगाव धबधब्याचे काम वेळेत झाल्यास येत्या पावसाळ्यात हे नवीन पर्यटनस्थळ जिल्ह्यात नावारूपास येऊन व्यावसायिकांसह स्थानिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, यात शंका नाही.

सहकार्यातूनच विकास शक्यकोणतेही विकासकाम असो, संबंधित खाते व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य असल्यास काम सहज शक्य होते. पालकमंत्री केसरकर, सावंतवाडी वनविभाग आणि मळगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून नरेंद्र डोंगरातील धबधबा सुशोभिकरणाचा प्रश्न एक वर्षात सुटला आहे. त्यामुळे विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमात अन्य कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

 

पर्यटनातून बदल घडविणारसिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. या जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी प्रयत्न आहेत. पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. आंबोली येथे बटरफ्लाय गार्डनसह इतर पर्यटनात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. याचा फायदा येथील लोकांना निश्चितच होणार आहे. जनतेने आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी, विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटनातून बदल घडवून आणले जातील.- दीपक केसरकर,पालकमंत्री

ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांना यशमळगाव हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाºया धबधब्याचे सुशोभिकरण करणे यासाठी मळगाव ग्रामपंचायत आणि वनसमितीने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यासाठी उपवनसंरक्षक, अधिकारी यांचे सहकार्य लाभले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्यामुळे धबधबा नव्या स्वरूपात साकारत आहे. यात मळगाव ग्रामपंचायत सदस्य व वनसमितीचेही प्रयत्न आहेत.- गणेशप्रसाद पेडणेकर,मळगाव ग्रामपंचायत वन समिती अध्यक्ष, सरपंच

काम लवकर पूर्ण करणारधबधब्याच्या विकासामुळे पर्यटनात वाढ होणार आहे. याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या निसर्गरम्य जागेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. पर्यटनात्मक बाबींना प्राधान्य देण्यासाठी वनखात्याचे प्रयत्न आहेत.समाधान चव्हाण,उपवनसंरक्षक, वनखाते सिंधुदुर्ग

सावंतवाडी-मळगाव घाटीतील धबधब्याचे पर्यटनात्मकदृष्ट्या नूतनीकरण व सुशोभिकरण होणार

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरsindhudurgसिंधुदुर्गwater parkवॉटर पार्क