शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 12:55 IST

हाती घेतलेले पण अर्धवट राहिलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग अन् रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेची उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. एलईडी मासेमारी विरोधात कडक कायदा करणार आहे. कोस्टगार्ड, पोलीस यांना एकत्र गस्त घालण्याचा सूचना दिलेल्या आहेत. हाती घेतलेले पण अर्धवट राहिलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ओरोसः सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेची उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आहे. पण या योजनेत नक्की आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गातील ओरोस येथे पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. एलईडी मासेमारी विरोधात कडक कायदा करणार आहे. कोस्टगार्ड, पोलीस यांना एकत्र गस्त घालण्याचा सूचना दिलेल्या आहेत. तसेच हाती घेतलेले पण अर्धवट राहिलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.निधी वितरण करताना अशा अपूर्ण प्रकल्पांबाबत प्राधान्यक्रम ठरवून तो वितरित केला जाईल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सहभागाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा बैठकांचे आयोजन केले जाते, यामधून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसापासून कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पसंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून कोकणात वातावरण तापले होते. यावरून शिवसेनेने सत्तेत आल्यावर आपली नाणार प्रकल्पासंदर्भात भूमिका बदलल्याची चर्चा होत होती. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच भाष्य केले आहे. याआधी सुद्धा नाणार प्रकल्पाला शिवसेनेचे विरोध होता आणि यापुढे सुद्धा राहणार, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे.

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी सामानातील नाणार प्रकल्पातील जाहिरातीविषयी पत्रकाराने प्रश्न विचारला असता, सामनामध्ये बद्धकोष्ठाची देखील जाहिरात येते, असे उत्तर ठाकरेंनी दिले. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे सर्व निर्णय मी घेतो. कोणतीही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. त्यामुळे शिवसेनेची भूमिका बदललेली नाही. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा आजही विरोध आहे आणि पुढेसुद्धा राहणार, असे परखड मत उद्धव ठाकरेंनी मांडले.एल्गारचा तपास केंद्राने काढून घेतला आहे. परंतु कोरेगाव-भीमाचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही आणि देणारही नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोकणातील आढावा बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. एल्गार परिषद प्रकरण आणि कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण हे दोन वेगळे विषय आहेत. दलित बांधवांचा विषय कोरेगाव भीमाशी संबंधित आहे. याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, केंद्राकडे देणार नाही.

कोरेगाव-भीमाचा तपास केंद्राकडे दिलेला नाही, यापुढेही देणार नाही- मुख्यमंत्री

कोरेगाव भीमामध्ये दलितांवर अन्याय झाल्याचा आक्षेप आहे. त्याबाबत मी स्पष्ट सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे एल्गार हा वेगळा विषय आहे. दलितांशी संबंधित असलेला कोरेगाव-भीमा प्रकरण हा वेगळा विषय आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकरणाचा तपास आपल्याकडून काढून घेतला आहे ते एल्गार प्रकरण आहे, कोरेगाव भीमाचं नाही. त्यामुळे कृपाकरून कोणीही गैरसमज करून घेऊ नका, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्ग