सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:43 IST2017-09-06T17:43:15+5:302017-09-06T17:43:56+5:30
सन २0१७-१८ या वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यानी कळविले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्गनगरी दि.0६ : जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार सन २0१७-१८ करिताचे गट स्तरावरुन प्राप्त पात्र प्रस्तावांमधून प्रत्येक तालुका निहाय एक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी विभागीय आयुक्त, कोकण भवन नवी मुंबई यांच्याकडून प्राप्त झाली आहे. या प्राप्त यादीनुसार पुढीलप्रमाणे सन २0१७-१८ या वर्षासाठी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यानी कळविले आहे.
पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक
वेंगुर्ला- सिताराम राया लांबर, उपशिक्षक. देवगड- प्रकाश राजाराम फोंडके, पदवीधर शिक्षक. सावंतवाडी - बाबाजी गोपाळ झेंडे, पदवीधर शिक्षक. वैभववाडी- आस्लम याकुब पाटणकर, पदवीधर शिक्षक. कुडाळ- महेश सहदेव गावडे, पदवीधर शिक्षक. कणकवली- संजय भगवान कदम, उच्च श्रेणी मुख्याध्यापक. मालवण- स्मिता गोपाळ परब, पदवीधर शिक्षक. दोडामार्ग-गीतांजली संतोष सातार्डेकर, पदवीधर शिक्षक.