शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; जानवलीत संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन, महामार्गावर वाहतूक कोंडी

By सुधीर राणे | Updated: May 18, 2024 14:00 IST

महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

कणकवली : कणकवली पासून जवळच मुंबई-गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेनजीक रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला कारने दिलेल्या धडकेत अनिल कृष्णा कदम (वय ५६, रा. जानवली बौद्धवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला चौवीस तास उलटून गेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या कारचालकाला पोलिस अटक करत नाही, तसेच महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देत संतप्त जानवली ग्रामस्थानी महामार्गावर 'रास्ता रोको' केला. तीन तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते. पोलिसांशी चर्चा करताना ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. महामार्गावर वारंवार अपघात होवून त्यात अनेक बळी जात आहेत.त्याला महामार्ग प्राधिकरण जबाबदार आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका  मांडली.मृत अनिल कदम हे गवंडी काम करत होते.  शुक्रवारी सकाळी ते मुंबई गोवा महामार्गावरून चालत कामावर जात होते. त्यादरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या परमिट कारने त्यांना धडक दिली होती. त्यानंतर तो कारचालक तिथे न थांबता गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेला. ही धडक एवढी जोरदार होती की अनिल कदम त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यामुळे जानवली ग्रामस्थ आक्रमक झाले.

गुरुवारी कणकवली पोलिस ठाण्यास भेट देत अनिल कदम यांना धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला लवकरात लवकर ताब्यात घेवून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा पोलिसांना दिला होता. तर शनिवारी सकाळ पासून जानवली येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गAccidentअपघातagitationआंदोलन