आंबोलीचा प्रभार ८० किलोमीटर दूरच्या वनक्षेत्रपालकडे, दीपक केसरकरांच्या बैठकीत पडसाद
By अनंत खं.जाधव | Updated: January 24, 2025 06:38 IST2025-01-24T06:37:43+5:302025-01-24T06:38:24+5:30
Amboli Forest News: आंबोली येथील वनक्षेत्रपाल यांची बदली होऊन तब्बल सहा महिने उलटले तरी अद्याप पर्यत आंबोली ला नवीन वनक्षेत्रपाल दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आंबोलीचा प्रभार ८० किलोमीटर दूरच्या वनक्षेत्रपालकडे, दीपक केसरकरांच्या बैठकीत पडसाद
सावंतवाडी - आंबोली येथील वनक्षेत्रपाल यांची बदली होऊन तब्बल सहा महिने उलटले तरी अद्याप पर्यत आंबोली ला नवीन वनक्षेत्रपाल दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आंबोली सारख्या वन दृष्ट्या संवेदनशील अशा वनक्षेत्र पदाचा प्रभारी कार्यभार सावंतवाडी कुडाळ येथील वनक्षेत्रपाल यांच्याकडे द्याचे सोडून तब्बल 80 किलोमीटर दूर अशा कडावल वनक्षेत्रपाल कडे देण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला असून याचे पडसाद आमदार दीपक केसरकर यांच्या बैठकीत ही चांगलेच उमटले.
या प्रभारी वनक्षेत्रपाला बद्दल यापूर्वीच अनेक तक्रारी असतना नव्याने आंबोली सारख्या संवेदनशील क्षेत्राचा कार्यभार देण्यात आला असून तातडीने या क्षेत्राला शासनाने नवीन वनक्षेत्रपाल द्यावा अशी मागणी होत आहे.आमदार केसरकर यांनी ही याची दखल घेत शासनाला तसे लवकरच कळवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आंबोली येथील वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार हा विद्या घोडके यांच्याकडे होता.पण त्याची सहा महिन्यापूर्वीच पदोन्नतीवर बदली झाल्याने या पदाचा कार्यभार कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके यांच्याकडे देण्यात आला आहे.मात्र कटके यांचा कायमस्वरूपी प्रभार हा कडावलचा असून कडावल ते आंबोली हे अंतर तब्बल 80 किलोमीटर चे आहे.त्यामुळेच ते कडावल चे काम करणार कि आंबोली चे काम करणार कसे असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.
आंबोली च्या जवळपास दोडामार्ग तसेच सावंतवाडी कुडाळ असे वनक्षेत्रपाल कार्यालय मात्र वनविभाग कटके याच्यावरच मेहरबान का?असा प्रश्न पडू लागला आहे.त्यातच गेल्या काहि महिन्यात आंबोली वनपरिक्षेत्रात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड व शिकारी चे प्रकार ही निर्दशनास आले आहेत तसेच परवाना धारक ट्रक थांबवून टोल वसुल करण्याचे प्रकार ही वाढले असून याबाबत काहिनी थेट कटके तसेच उपवनसंरक्षक यांच्याकडे ही तक्रारी केल्या आहेत.
आंबोली वनपरिक्षेत्र हे संवेदनशील असल्याने येथील कार्यभार प्रभारी कडे देण्याऐवजी कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा यासाठी बुधवारी सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवाज उठवण्यात आला असून या प्रकारानंतर आमदार केसरकर यांनी आपण शासनाकडे मागणी करून लवकरच आंबोली येथे कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल देण्यास सांगू असे स्पष्ट केले आहे.या प्रकारानंतर उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांनी ही आंबोली बाबत काहि तक्रार असल्यास थेट मला संपर्क करा असे आवाहन उपस्थितांना केले.