शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सिंधुदुर्ग : डंपर चोरी करताना तिघांना पकडले, एक साताऱ्याचा, दोघे कोल्हापूरचे- दाणोली येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:54 IST

सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दाणोली येथे तिघा संशयितांना डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आंबोली व दाणोली ग्रामस्थांना करवी पकडण्यात आले

ठळक मुद्देजिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील डंपर चोरीप्रकरणी यांचा काही हात आहे का याचीही चौकशी होणार आहे .. जवळपास शंभर फूट अंतर पळाल्यावर गजानन देसाई व डंपर मालक सुनील नार्वेकर यांनी पाठलाग करत धाडस करून डंपर चोरांना पकडून देणारा जॉन्सन

आंबोली (सिंधुदुर्ग) : सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दाणोली येथे तिघा संशयितांना डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आंबोली व दाणोली ग्रामस्थांना करवी पकडण्यात आले. ज्या तिघांना पकडण्यात आले त्यांना आंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .                    आंबोली येथील नंदकुमार नार्वेकर यांच्या मालकीचा डंपर क्रमांक जीए 0७ टी ५१४७ दाणोली येथील या डंपरवरील चालक जॉन्सन मार्सेलिन लॉडरीक यांच्या घरी दाणोली येथे उभा होता. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कुणीतरी डंपर चालू करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे जॉन्सन यांच्या लक्षात आले.

जॉन्सन घराच्या बाहेर लगेच आला. त्यावेळी डंपर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेली व्यक्ती डावा बाजूचा दरवाजा उघडून पळून गेली .जॉन्सन याने न घाबरता त्या व्यक्तीचा म्हणजे सुभाष गंगाराम सावंत ४८ यांचा पाठलाग केला. परंतु तो सापडू शकला नाही. तसंच पुढे आल्यानंतर  जॉन्सन याला बावळाट तिठा येथे एक संशयित अल्टो कार क्रमांक एम.एच ११ बी.व्ही ९१६३ हे उभी असल्याचे दिसले. त्यांने लगेच त्या कारजवळ जाऊन कारमधील दोघा संशयित व्यक्तींची विचारना केली. त्यावेळी त्या दोघा व्यक्तींना नीट उत्तर देता आली नाही.

त्यामुळे जॉन्सन यांचा संशय बळावला व त्याने लगेच कारची चावी काढून घेतली . त्यांना कारमध्येच बसून राहण्यास सांगितले. लगेचच जॉन्सन याने आंबोली पोलिसांना व डंपर मालकांला बोलावून घेतले. साडेपाच वाजताच्या सुमारास त्या दोघा व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते आंबोलीच्या दिशेने येऊ लागले. तेवढ्यात दाणोली पासून दोनशे मीटर आंबोलीच्या दिशेने एक व्यक्ती चालत जाताना दिसली.

त्या व्यक्तीला कॉन्स्टेबल गजानन देसाई यांनी गाडीतच बसून आंबोलीला कसे जायचे असे त्याला विचारले. त्या व्यक्तीला गाडी त्याच्या साथीदाराची असल्याचे लक्षात आल्यावर तो पळून जाण्याच्या तयारीत होता. जवळपास शंभर फूट अंतर पळाल्यावर गजानन देसाई व डंपर मालक सुनील नार्वेकर यांनी पाठलाग करत त्या व्यक्तीला म्हणजे सुभाष सावंत याला पकडून त्याच्या दोन साथीदारांसोबत त्यांच्याच अल्टो कारमध्ये बसून आंबोली पोलीस स्थानकात घेऊन आले. सुरुवातीला हे तिघेही एकमेकांना ओळखत नसल्याचे सांगत होते. परंतु पोलिसी हिसका दाखवल्यानंतर तिघांनीही आपापली खरी ओळख सांगितली व उद्देशही सांगितले .

हे तिघेही सराईत गुन्हेगार दिसत असून यातील सुभाष गंगाराम सावंत (राहणार ४८ दिवडि . ता माण. सातारा), अन्वर दाऊद दोसानि (६२), आसिफ रफीक पठाण (वय ३० दोघेही राहणार संभाजीनगर कोल्हापूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील डंपर चोरीप्रकरणी यांचा काही हात आहे का याचीही चौकशी होणार आहे .

डंपर चोरी टोळीचा पर्दाफाशगेल्या वर्षभरात जिल्ह्यामध्ये डंपर चोरीप्रकरण मोठ्या प्रमाणावर वाढली होती. ज्यामुळे डंपर चालक मालक हैराण झाले होते. पोलिसांनाही त्यांना पकडण्यात अपयश येत असताना जॉन्सन याने दाखवलेल्या धाडसामुळे या डंपर चोरांना पकडण्यात यश आले. यावेळी त्यांना आंबोलीतील पोलीस कॉन्स्टेबल गजानन देसाई, मायकल डिसोझा, सुनील नार्वेकर, उत्तम नार्वेकर, राजू राऊळ यांनीही मदत केली या सर्वांचे परिसरातून कौतुक होत अाहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर