शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

आंबोलीची ओळख होतेय ‘कडेलोट पाँर्इंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 21:07 IST

गेल्या पाच महिन्यांत आंबोलीत ६ मृतदेह सापडल्याने आंबोलीची ओळख बदलून ‘कडेलोट पॉर्इंट’ झाली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यटनाच्या हॉटस्पॉटची होणारी ही बदनामी थांबविण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांत खून करून आंबोलीच्या जंगलात फेकून देण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत.अवैध धंद्यांना आंबोली ही आश्रयस्थान असल्यासारखे वातावरण निर्माण होत आहे.यासाठी आपण सर्वच जबाबदार आहोत. केवळ तीन-चार पोलीसच कसा काय बंदोबस्त ठेवू शकतात?

महेश सरनाईक/सिंधुदुर्ग -  कोकणातील निसर्गरम्य, थंड हवेचे ठिकाण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती आंबोली. सिंधुदुर्गच्या डोक्यावर (घाटमाथ्यावर) वसलेले हे छोटेसे गाव. समुद्र सपाटीपासून २३०० ते २४०० फूट उंचीवर असल्याने स्वाभाविकच येथील हवामान थंड आहे. घाटमाथ्यावरील पोषक वातावरणामुळे येथील सदाहरित प्रकारची जंगले पाहता डोळ्यांचे पारणे फिटते. त्यामुळेच देशाच्या कानाकोपºयातून दरवर्षी लाखो पर्यटक या निसर्गरुपी खजिन्याचा आस्वाद लुटण्यासाठी आंबोलीत येतात. मात्र, गेल्या वर्षभरात आंबोलीच्या या निसर्ग सौंदर्याला गालबोट लागल्यासारखे वाटत आहे. गेल्या पाच महिन्यांत आंबोलीत ६ मृतदेह सापडल्याने आंबोलीची ओळख बदलून ‘कडेलोट पॉर्इंट’ झाली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यटनाच्या हॉटस्पॉटची होणारी ही बदनामी थांबविण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच उभे ठाकले आहे.कोकण विभागातील गोवा व बेळगावपासून अत्यंत जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे आंबोली. कोल्हापूर, बेळगाव, गोवा व कोकण विभागातील पर्यटकांना विरंगुळा देणारे आंबोली हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. येथे एकीकडे सह्याद्रीचे रौद्र, विहंगम सौंदर्य, समोर दिसणारी अथांग सागराची निळाई व सह्याद्रीच्या कुशीत हिरवी वनश्री लेऊन आंबोली वसली आहे. आंबोली हे गाव बेळगावपासून ७० किलोमीटर व कोल्हापूरपासून ११७ किलोमीटर अंतरावर आहे. आंबोलीचा माथा थंडगार झाडीने आच्छादलेला असून, समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. सर्व ऋतूत या ठिकाणची हवा आल्हाददायक असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपºयासह देश आणि परदेशातून दरवर्षी चार ते पाच लाख पर्यटक येथे येत असतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. निसर्गदृश्ये पाहण्यासाठी आंबोली येथे ९ ते १० पॉर्इंट आहेत. आंबोलीत चांगला मधही मिळतो. आंबोली येथे पर्यटन विकास महामंडळाने २५ पर्यटक निवासगृहे बांधलेली आहेत. ही पर्यटक निवासस्थाने शासनाने खासगी संस्थेला चालवावयास दिली आहेत.आंबोलीत हिरवी वसुंधरा, निळे स्फटिकासम आकाश आणि हवाहवासा वाटणारा गारवा आपल्याला खिळवून ठेवतो. आंबोलीत या दिवसात आपण जरा लवकरच पांघरूणातून बाहेर येत फिरलो तर एक स्वर्गसुख अनुभवायला मिळते. सकाळच्या वेळी मोठ्या चिºयांच्या दगडात, कारवीच्या झुडपात आपणास चरणारे गवे अगदी आरामात पाहता येतात. छोट्या छोट्या टोपल्या उलट्या घालून ठेवल्यासारखी वाटणारी टोपली कारवी फोटोमध्ये अत्यंत सुंदर भासते.आंबोलीचा माळ सोडला की अंगावर ऊन पडू शकत नाही अशी घनगर्द झाडी आहे. याठिकाणी तांबट, वार्सब्लट, शिंजीर, शामा या पक्ष्यांच्या शिकारी टोळ्या आपणाला भेटतात. पावसानंतर पैदास झालेली अनोखी फुलपाखरे अगदी हजारोंच्या संख्येने काही ठिकाणी दृष्टीस पडतात. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर कोकणी जेवणाची चव देणारी अनेक हॉटेल्स येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक निवासी पर्यटनाचाच आनंद येथे लुटताना आढळतात.आंबोली ही पर्यटनाची राजधानी आहे. या राजधानीला गेल्या वर्षभरापासून खुनाच्या उघडकीस येणाºया घटनांमुळे गालबोट लागले आहे. खुनी लोकांसाठी आंबोली हिलस्टेशन डेस्टीनेशन झाल्यासारखे वाटत आहे. आत्महत्या, खून यासारख्या घटना आंबोलीत मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत असल्याने आंबोलीची ओळख दिवसेंदिवस बदलत चालली आहे. ही बदलत चाललेली ओळख पुसण्यासाठी आता शासनकर्त्यांनी जागे होणे आवश्यक आहे.आंबोलीतील काही पर्यटनस्थळांकडे मोठमोठे हायमास्ट टॉवर (मोठे दिवे) उभारण्यात आले आहेत. यामुळे काही ठिकाणांकडे रात्रीच्यावेळी जाऊन खुनासारख्या घटना करणे आणखीनच सोपे होत आहे. या हायमास्ट टॉवरच्या प्रकाशाचा गैरफायदा घेण्याचे काम क्रूरकर्म्यांकडून केले जात आहे. आंबोलीच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या नावाखाली काही अवैध व्यावसायिक या ठिकाणी आपली बस्ताने मांडत आहेत. हे एवढे सगळे घडत असतानाच आंबोलीची मात्र, बदनामी होत आहे.गेल्या काही वर्षांतच आंबोलीतील ‘क्राईम’च्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र, राज्यकर्त्यांनी केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या गप्पा मारण्यापेक्षा आंबोलीची ओळख पुसू पाहणाºया घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर खर्च केला पाहिजे. आंबोली हे सिंधुदुर्गवासीयांना लाभलेले महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. मात्र, त्याची जाणीव त्यांना होताना दिसत नाही. केवळ इतर भागाप्रमाणे येथे न्याय न देता केवळ पर्यटनाचे हब म्हणून वेगळा निधी आंबोलीसाठी देणे आवश्यक आहे. आंबोलीतील समस्या नेमक्या काय आहेत? त्या मिटविण्यासाठी काय केले पाहिजे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसे झाले तरच आंबोलीची होणारी बदनामी थांबेल. नाही तर पर्यटनासाठी अतिशय सुंदर आणि मनमोहक असणारा आंबोलीचा परिसर हा खुन्यांसाठी होत असलेले आश्रयस्थान आणखीनच गडद होत जाणार आहे. त्यातूनच मग आंबोलीची ओळख बदलायला वेळ लागणार नाही. त्याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होईल आणि आंबोलीचे नाव बदनाम होईल.दक्षिण घाटातील निसर्गरम्य आंबोलीच्या नैसर्गिक ठेव्याचे जतन करताना शासनकर्ते कमी पडत आहेत.आंबोलीला योग्य न्याय मिळत नसल्यामुळे येथे येणाºया पर्यटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.महाराष्ट्रातील इतर भागातील पर्यटनस्थळांकडे ज्या प्रमाणात शासनकर्ते लक्ष देतात, तेथील सुविधांसाठी पाठपुरावा करतात. त्याप्रमाणात आंबोलीसाठी पाठपुरावा होताना दिसत नाही.प्रत्येक पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते हे अतिशय दर्जाहीन आहेत. या रस्त्यांवर पडलेले खड्डे किंवा होत असलेली दुरूस्ती तकलादू असते.त्यामुळे ‘नेहमीच येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे येथील रस्त्यांच्या डागडुजीची कामे केली जातात.आंबोली हे जिल्ह्यातील असे एकमेव गाव आहे की त्याठिकाणच्या समस्यांसाठी पत्रकारांना आंदोलने, उपोषणे करण्याची वेळ येत आहे.आंबोलीतील रस्ता दुरूस्ती, बसस्थानकासह इतर कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सामाजिक भावनेतून पत्रकारच रस्त्यावर उतरत असतात.पत्रकार मंडळीच आंबोलीतील समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी आंदोलने करीत असतात.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याची जबाबदारी ही लेखणीतून एखाद्या विषयाला वाचा फोडण्याची असते.आंबोली येथे कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिलस्टेशनवरील समस्यांबाबत वर्तमानपत्रांमधून वेळोवेळी आवाज उठविल्यानंतरही मुर्दाड शासनकर्त्यांना जाग येत नाही.त्यामुळे आंबोलीतील पत्रकारांना आंदोलने, उपोषणे करण्याची वेळ येत आहे. हे मार्ग अवलंबिल्यानंतर राज्यकर्ते त्या काळापुरते किंवा त्या आंदोलना पुरते या समस्यांवर मलमपट्टी करतात.आंबोली हे पर्यटनस्थळ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. यात प्रामुख्याने वाहतुकीचे रस्ते अतिशय खराब झाले आहेत.एवढ्या मोठ्या पर्यटनस्थळाकडे जाताना आवश्यक खबरदारी प्रशासनाने घेतलेली जाणवत नाही.४सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे कुठलीही घटना घडल्यानंतर तिचे पुरावे गोळा करताना प्रशासनाच्या नाकीदम येत आहेत.केवळ पावसाळी पर्यटनाच्या दिवशी आंबोली धबधब्याजवळ होणाºया गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी ठेवला जातो.मात्र, पावसाळी हंगाम संपल्यानंतर पुन्हा आंबोली दूरक्षेत्रावर असलेले केवळ तीन पोलीस पुन्हा संरक्षणाच्यादृष्टीने कार्यरत असतात.आंबोली हिलस्टेशनच्या सर्व पंधरा ते वीस किलोमीटरच्या परिसरात केवळ तीन-चार पोलीसच कसा काय बंदोबस्त ठेवू शकतात?पावसाळ्याचे काही महिने वगळता या ठिकाणी सर्वच आलबेल असल्यासारखे असते. कमी असलेला पोलीस फौजफाटा, सीसीटीव्ही यंत्रणेचा बोजवारा अशा अनेक कारणांमुळे आंबोलीत अवैध व्यवसायांना ऊत येत आहे.आंबोलीतील आणखी एक अतिशय महत्त्वाची समस्या म्हणजे या संपूर्ण परिसरात कोठेही सार्वजनिक शौचालय नाही.एका दिवसासाठी पर्यटनास येणाºया पर्यटकांसाठी कोठेही चेंजिंग रूमची व्यवस्था नाही.त्यामुळे येणाºया पर्यटकांना खास करून महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून आंबोलीत येणाºया पर्यटकांकडून करवसुली करण्यात येत आहे. आता येणाºया लाखो पर्यटकांकडून मिळणाºया करातून आवश्यक त्या सुविधा येथे पुरविणे ही शासनकर्त्यांची जबाबदारी नाही काय ?यासाठी आपण सर्वच जबाबदार आहोत. शासनकर्त्यांना या समस्या सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा.सिंधुदुर्गचे पालकमंत्री हे राज्याचे गृहराज्यमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे दीपक केसरकर यांनी आंबोलीसाठी आणखी काही पोलिसांची कुमक देऊन या ठिकाणी विशेष पोलीस बिट होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.सागरी महामार्गावर काही वर्षांपूर्वी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती