शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार कोसळूनही गतवर्षीच्या सरासरीपेक्षा मागेच, अधून-मधून जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:53 IST

३१ ऑगस्टपर्यंत सरासरी २५०७.८ मिलीमीटर पाऊस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. या महिन्यात मुसळधार पाऊस पडला आहे. असे असले तरी पावसाने गतवर्षीची सरासरी अद्याप गाठलेली नाही. गेल्यावर्षी आजअखेर (३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत) सरासरी ३३०५.८ मिलीमीटर पाऊस पडला होता. तोच चालू वर्षात आजपर्यंत (३१ ऑगस्ट रोजी) सरासरी २५०७.८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सरासरी ७९८ मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे. सप्टेंबर महिन्यात आणि परतीच्यावेळी पावसाचा जोर कायम राहिल्यास पाऊस आपली सरासरी गाठू शकतो.जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या मानाने मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कधी-कधी तर वादळी वाऱ्यासह पडणारा मुसळधार पाऊस जिल्ह्याला झोडपून काढतो. पावसाच्या हंगामापूर्वीच मे महिन्यात पडलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यानंतर जून पासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. जून महिन्यात समाधानकारक पडणाऱ्या पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यांच्या मधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या गणेशोत्सव चालू असून यावेळीही अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.२०२५ मधील पावसाची आकडे पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरी पाऊस कमी झाला आहेत. त्यात ऑगस्ट महिन्यात एकूण सरासरीच्या वरती पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार जून महिन्यात सरासरी ८८०.१ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. तो यावेळी जून महिन्यात सरासरी ६७३.५ मिलीमीटर एवढा पाऊस पडला म्हणजेच ७६.५ टक्के पाऊस जून महिन्यात पडला. जुलै महिन्यात सरासरी १०४३.६ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, जुलै महिन्यात सरासरी ९७५.६ मिलीमीटर पाऊस पडला त्याची टक्केवारी ९३.५ एवढी आहे. तर ऑगस्ट महिन्यात सरासरी ६८९.२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते.मात्र, या महिन्यात सरासरी ८५८.७ मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे या महिन्यात १२४.६ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. असे असले तरी एकूण सरासरी पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्यावर्षी आजअखेर (३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत) सरासरी ३३०५.८ मिलीमीटर पाऊस पडला होता. तोच चालू वर्षात आजपर्यंत (३१ ऑगस्टला) सरासरी २५०७.८ मिलीमीटर पाऊस पडला आहे.अद्यापही सरासरी ७९८ मिमी. कमीच..सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सरासरी ७९८ मिमी. पाऊस कमी पडला आहे. सप्टेंबर महिन्यात आणि परतीच्या वेळी पावसाचा जोर कायम राहिल्यास पाऊस आपली सरासरी गाठू शकतो. त्यात मे महिन्यात पडलेला सरासरी २०० मिमी. पाऊस पकडला तरी सुमारे सरासरी ५९८ मिमी. पाऊस अद्यापही कमीच पडल्याचे स्पष्ट होत आहे.