शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

शिवसेनेवरील आरोप दिशाभूल करणारे, भाजप आमदारांची घोषणा फसवी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 13:33 IST

पडवे मेडिकल कॉलेजची लॅब कोविड चाचणीसाठी सक्षम नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लेखी पत्र दिले आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये केवळ क्लिनिकल लॅब आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनही व खासगी कॉलेजला आमदार निधी देता येत नाही हे मान्य असताना भाजपा आमदारांकडून पडवे मेडिकल कॉलेजमधील कोविड टेस्ट लॅबसाठी निधी देण्याची फसवी घोषणा केली जात आहे.

ठळक मुद्दे शिवसेनेवरील आरोप दिशाभूल करणारे, भाजप आमदारांची घोषणा फसवी : उदय सामंत आमदारांना खासगी कॉलेजला निधी देता येत नाही; शिवसेनेवरील दरेकरांचे आरोप दिशाभूल करणारे

कणकवली : पडवे मेडिकल कॉलेजची लॅब कोविड चाचणीसाठी सक्षम नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लेखी पत्र दिले आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये केवळ क्लिनिकल लॅब आहे. ही वस्तुस्थिती माहीत असूनही व खासगी कॉलेजला आमदार निधी देता येत नाही हे मान्य असताना भाजपा आमदारांकडून पडवे मेडिकल कॉलेजमधील कोविड टेस्ट लॅबसाठी निधी देण्याची फसवी घोषणा केली जात आहे.

प्रत्येकी २० लाखांचा आमदार निधी देण्याची घोषणा करून कोकणवासीयांची फसवणूक करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. असे सांगतानाच शिवसेना आणि कोकणचे नाते अतूट आहे. त्यामुळे कोणीही कितीही भडकविण्याचा प्रयत्न केला तरी कोकणी जनता त्याला बळी पडणार नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, सुशांत नाईक, शैलेश भोगले, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, मंगेश लोके, राजू राठोड आदी उपस्थित होते.मंत्री उदय सामंत म्हणाले, भाजपाचे सर्व आमदार रेड झोनमधून आले आहेत. पालकमंत्री म्हणून मी तपासणी नाक्यावर त्यांना अडविले असते. मात्र, ते प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आले असतील म्हणून आम्ही दुर्लक्ष केले.

जे बोलायचे ते खोटेच बोलायचे आणि सिंधुदुर्गवासीय व चाकरमानी यांच्यात वाद लावून द्यायचे. ही त्यांची भूमिका आहे. मुंबईकरांना आमचा विरोध नाही. गेल्या ३ दिवसांत २७ हजार लोक आले. प्रशासनाकडून रितसर परवाना घेऊन चाकरमान्यांनी यावे, असे आमचे म्हणणे आहे.आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह यावरूनही विरोधकांकडून राजकारण सुरू झाले आहे. तसे विरोधकांनी करू नये. अहवालातील प्रिंटिंग मिस्टेकचा तो परिणाम होता. त्याबाबत संबंधितांनी लगेचच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनावावर चुकीचे आरोप कोणीही करू नयेत.

ज्यावेळी भाजपवाले सत्तेत होते त्यावेळचेच अधिकारी आताही आहेत. पण वेगळ्या चष्म्यातून पाहिल्यामुळे त्यांना आता ते चूक वाटत आहेत. शिवसेना आणि कोकणचे नाते अतूट आहे. त्यामुळे कोणी कितीही भडकविण्याचा प्रयत्न केल्यास कोकणी जनता त्याला बळी पडणार नाही.

शासन व पडवे येथील मेडिकल कॉलेज एकत्र येऊन लॅब करीत असतील तर जिल्हा नियोजनमधून त्यांना निश्चित पैसे देऊ. डेरवणला बरीच वर्षे रुग्णालय सुरू आहे. त्यामुळे तिथे मंजुरी दिली आहे. पडवे कॉलेज आता सुरू होत आहे. पडवे हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ चाचणीसाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. तंत्रज्ञ नाहीत. असा जिल्हा आरोग्य विभागाकडून अहवाल देण्यात आला आहे.जिल्ह्यात माकडताप आल्यानंतर साडेआठ कोटींची लॅब जिल्हा रुग्णालयात होत आहे. तसेच कोविड तपासणीबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वॅब तपासणी मशीन दोन दिवसांत येईल. आता कोल्हापूरमध्ये जिल्ह्यातील स्वॅब चाचणी होत आहे. तसेच परराज्यातील परीक्षा पहिल्यादा दोडामार्गमध्ये झाली, हे विरोधकांनी पहावे.वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्र्यांनी चांगले नियोजन केल्याने कोरोना साथ आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या शून्य रुग्णाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. प्रमोद जठारांनी आता जिल्ह्यात रहावे. ते येथे येणार, राजकारण करणार आणि पुन्हा जाणार. हे चालू राहील. त्यामुळे त्यांनी येथेच थांबावे, असा उपरोधिक टोला वैभव नाईक यांनी लगावला.

रिक्षा, बससेवा आजपासून सुरू होणार; भाजपमुळेच काजूचे दर पडले रिक्षा व बससेवा २२ मे पासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. सोशल डिस्टन्स राखून रिक्षा चालू होणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू होणार आहेत, असे उदय सामंत यावेळी म्हणाले.जिल्ह्यातील सरपंचांची बैठक घेतली. त्यावेळी मुंबईकर चाकरमान्यांचे सरपंच स्वागत करीत आहेत. फक्त अधिकृत पास घेऊन त्यांनी यावे अशी त्यांची मागणी आहे. आम्हांला चाकरमान्यांची काळजी आहे. त्यामुळेच पास घेऊन या असे आमचे त्यांना सांगणे आहे. कारण त्यामुळे व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.काजूचे दर पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे काम चालू आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची एकवाक्यता असती तर काजू बागायतदारांना चांगला दर मिळाला असता. फक्त टीका करीत राहणे असे धोरण भाजप नेत्यांचे आहे, अशी टीका सतीश सावंत यांनी यावेळी केली.विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना बदनाम करणे सुरू आहे. शुक्रवारी भाजप आंदोलन करुन काय संदेश देणार आहे? त्यांच्या काही सूचना असतील तर त्या कराव्यात. मी स्वत: तयार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जो सल्ला दिला तो भाजपा पाळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा गडकरींचे ऐकत नाही हे या आंदोलनात दिसून येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग