शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

समुद्री राष्ट्रीय सुरक्षेसाठी एआय सीसीटीव्ही यंत्रणा बसवणार, सिंधुदुर्गमधील सर्व समुद्रकिनारे सुरक्षित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:46 IST

सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित; मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यानुषंगाने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, मुंबई येथे सोमवारी (दि. १३ रोजी) बैठक झाली.देवगड, मालवण व वेंगुर्ला पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील विविध बंदर व जेटीवरील जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाकरिता असतात. तसेच बंदर परिसरातील हद्दीत संशयित दहशतवादी व गुन्हेगार लपून बसण्याची शक्यता असल्याने सागरी सुरक्षेस धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर देवगड, मालवण आणि वेंगुर्ला पोलिस ठाण्यांच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एआययुक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.सहा ठिकाणी बसणार यंत्रणाया प्रकल्पासाठी देवगड पोलिस ठाणे येथे ४,५९,९५,८३५ रुपये, आचरा पोलिस ठाणे ३,७४,६३,६१३ रुपये, विजयदुर्ग पोलिस ठाणे २,८७,९८,१२१ रुपये, मालवण पोलिस ठाणे ४,५८,७७,७८३ रुपये, निवती पोलिस ठाणे ४,४६,२३,६८० रुपये आणि वेंगुर्ला पोलिस ठाणे ४,५५,४७,१३६ रुपये, एवढी अंदाजे रक्कम अपेक्षित आहे. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षेची बाब लक्षात घेता संबंधित पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याच्या सूचना या बैठकीत संबंधितांना दिल्या आहेत.हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनासिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर एकूण ९२ लँडिंग पॉइंट्स असून, या सर्व ठिकाणी पोलिस यंत्रणा अथवा सुरक्षा दल अधिकारी ठेवणे शक्य नाही. अशा ठिकाणी बंदरांच्या जेटीवर व जहाजांवर अनेक परप्रांतीय कामगार कामकाजाच्या दृष्टीने येत असतात. त्यातून समाजविघातक व संशयित दहशतवादी गुन्हेगार आदी येऊन लपून बसण्याची व राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्वेलन्स यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी बैठकीत दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : AI CCTV system for coastal security in Sindhudurg to be installed.

Web Summary : Sindhudurg to get AI-powered CCTV surveillance for enhanced coastal security. Cameras will be installed at six police station jurisdictions to monitor suspicious activities and potential threats, strengthening national security.