आमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:35 IST2019-02-23T17:32:38+5:302019-02-23T17:35:20+5:30
आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

आमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका
मालवण : कोळंब पूल धोकादायक स्थितीत असताना आमदार वैभव नाईक यांनी पयार्यी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. गेल्या चार वर्षात कुडाळ-मालवण मतदारसंघाची बिकट अवस्था करून ठेवली असून जनतेला केवळ शब्द देणे हाच सत्ताधारी विकास समजत आहेत.
आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.
कोळंब पूल संघर्ष समितीच्या मागणीनुसार स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी आडारी-निवे या पयार्यी मागार्साठी २५ लाखाचा निधी मंजूर केला. या रस्ता कामाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आडारी ढोलमवाडी येथे करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मंदार केणी तर कृष्णानाथ तांडेल यांनी विचार मांडले. यावेळी राणे यांनी कोळंब पूल संघर्ष समितीचे कौतुक केले.
यावेळी स्वाभिमानाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, कृष्णनाथ तांडेल, सभापती सोनाली कोदे, बाबा परब, नगरसेवक यतीन खोत, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, सन्नी कुडाळकर, राऊळ, सजेर्कोट सरपंच सौ. परुळेकर, विजय नेमळेकर, गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, मंदार लुडबे, सुर्यकांत फणसेकर, निखिल नेमळेकर, रामदास ढोलम, बबन मलये, हरिश्चंद्र ढोलम, हनुमंत ढोलम, मनोहर करंगुटकर, विशाल ढोलम, अनिल मलये, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम यांच्यासह ग्रामस्थ व स्वाभिमान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश राणे म्हणाले, आमदार नाईक यांच्यात पयार्यी मागार्ला निधी देण्याची क्षमता नसल्याने संघर्ष समितीला खासदार नारायण राणे यांनी २५ लाखाचा निधी मंजूर करून दिला. आमदार, खासदार यांनी सत्ताकाळात केलेली पाच विकासकामे जाहीर करावी. खासदार राणे आमदार असते तर कोळंब पुलाचे काम केव्हाच मार्गी लागले असते. }
खासदार विनायक राऊताना जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळही नाही. खडी, डांबर हाच नाईकांचा व्यवसाय असून शासकीय रस्त्यांची कामे त्यांचा भाऊ करोडो रुपये कमावतो आणि त्याच पैशातून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटली जाते. जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे होत नसल्याने सत्ताधा?्यांना जनता शिव्या घालू लागली आहे, असा टोला राणे यांनी लगावला.