सिंधुदुर्ग - नुकतेच राज्यात २९ महापालिका निवडणुकींचा निकाल समोर आला. त्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पाहायला मिळाले. या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच बिनविरोध पॅटर्न चर्चेत आला. यात मतदानापूर्वीच महायुतीचे ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावरून विरोधकांनी बरीच टीका केली. मात्र आता पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हाच पॅटर्न दिसून येत आहे. सिंधुदुर्गात पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या महायुतीचे २ उमेदवार निवडून आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकिसरे जिल्हा परिषद गटातून साधना नकाशे यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यांच्याविरोधात विरोधकांपैकी कुणीही अर्ज न दिल्याने साधना नकाशे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघात भाजपाचा पहिला उमेदवार बिनविरोध आल्याने कार्यकर्त्यामधील उत्साह वाढला आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषदेतही बिनविरोध निवडणुकीचा ट्रेंड कायम राहिल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.
त्याशिवाय बिडवाडी पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपा उमेदवाराला लॉटरी लागली. याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विद्या शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अर्ज छाननीत ३ अपत्याच्या कारणास्तव विद्या शिंदे यांचा अर्ज बाद झाला. त्याठिकाणीही भाजपा-शिंदेसेना महायुतीच्या संजना राणे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्या बिनविरोध विजयी ठरल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे २ उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध आल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही बिनविरोध उमेदवार भाजपा आमदार मंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Summary : Following the municipal elections, the 'uncontested' pattern persisted in Sindhudurg's Panchayat Samiti elections. BJP's alliance secured two unopposed victories. Candidates Sadhana Nakashe and Sanjana Rane won without contest, boosting BJP's presence in Nitesh Rane's constituency.
Web Summary : नगरपालिका चुनावों के बाद, सिंधुदुर्ग पंचायत समिति चुनावों में 'निर्विरोध' पैटर्न जारी रहा। भाजपा गठबंधन ने दो निर्विरोध जीत हासिल कीं। साधना नकाशे और संजना राणे बिना प्रतिस्पर्धा के जीतीं, जिससे नितेश राणे के निर्वाचन क्षेत्र में भाजपा की उपस्थिति बढ़ी।