शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

दारूबंदीसाठी तंटामुक्त समितीचा पुढाकार हवा

By admin | Updated: October 2, 2014 22:25 IST

संसार उद्ध्वस्त : ग्रामीण भागात अजूनही हातभट्ट्यांची धगधग

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी-दारूच्या व्यसनामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण भागात हातभट्ट्या धगधगत आहेत. हातभट्ट्यांची संख्या अल्प असली तरी गावोगावी विक्रेत्यांची संख्या अधिक आहे. गावोगावी नियुक्त करण्यात आलेल्या तंटामुक्त समित्यांनी याकामी पुढाकार घेतला तर संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी होऊ शकते.रत्नागिरी जिल्ह्यात २००७ पासून तंटामुक्त गाव अभियानाला प्रारंभ झाला. दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर प्रकारचे तंटे सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. तंटे सोडवून गावात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच ग्राम सुरक्षा, दारूबंदी यांसारखे उपक्रम राबवण्याची गरज आहे. जेणेकरून गावात खऱ्या अर्थाने शांतता निर्माण होईल, संसार सुखाने नांदतील. तंटामुक्त समित्या व ग्रामस्थांचा सुरूवातीला उत्साह अधिक होता. पहिल्या तीन वर्षांत समित्यांच्या बैठका नियमित होऊन तंटे सोडवण्यावर विशेष भर देण्यात येत होता. एकूणच तंटामुक्त गावासाठी असलेल्या लाखो रूपयांच्या पारितोषिकांमुळे ग्रामस्थ, समित्यांमध्ये उत्साह दांडगा होता.तडजोडीने मिटणारे सर्व तंटे गावातच मिटावे, असे योजनेचे उद्दिष्ट असल्याने समित्या त्यासाठी प्रयत्नशील होत्या. जिल्ह्यातील ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त घोषित झाल्या आहेत. अद्याप ३१० गावे तंटामुक्त झालेली नाहीत. दरवर्षी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे. परंतु तंटामुक्त समित्यांनी तंटे मिटविण्याबरोबर गावात शंभर टक्के दारूबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दारुच्या व्यसनाने अंकुश वेलोंदे याने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केले. दारूच्या नशेत पत्नीचा खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याने आता तिन्ही मुलांचे जीवन अंधारमय झालं आहे. आजीही वृध्द झाल्याने तिचा आधार कुठपर्यंत मिळणार आहे. व्यसनाधीन झालेल्या अंकुशला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला होता. अखेर त्याने व्यसनाच्या भरात स्वत:सह पत्नीचाही घात करुन मुलांना वाऱ्यावर सोडले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने ओरी गाव हादरला. त्याचबरोबर रूग्णालयात उपचारासाठी दाखल पतीनेच डबा घेऊन आलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटना निकटच्या असल्या तरी अशा प्रकारच्या अनेक घटना वर्षभरात घडत असतात. त्यामुळे त्यासाठी तंटामुक्त समित्यानी सामाजिक संस्थांच्या सहाय्याने व्यसनमुक्तीसाठी दारूबंदी करण्याची गरज आहे.मिरजोळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठोबा पाटील सलग चार वर्षे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. गावात त्यांनी दोन वर्षांपूर्वी (२०१२-१३) मध्ये संपूर्ण दारूबंदी केली होती. गावात घरोघरी फिरून दारूबंदीचे आवाहन करण्यात आले होते. तसा प्रयत्न सर्वत्र करणे गरजेचे असल्याचे मत विठोबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.