शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

सातार्डा येथे ट्रक अडविला --पत्रकाराचा कॅमेरा फोडला

By admin | Updated: December 16, 2014 00:04 IST

गौडबंगाल : ट्रक तपासणीवरून ग्रामस्थ आक्रमक

सार्ताडा : सेव्हन स्टार मायनिंग कंपनीच्या नावाने संशयास्पदरित्या सातार्डा येथे आलेल्या कॅल्शीयम हायड्रोक्साईड पदार्थामागचे गौडबंगाल रात्री उशिरापर्यंत उलगडले नव्हते. सातार्डा ग्रामस्थांनी ट्रकची तपासणी करण्याची मागणी करून सुध्दा पोलिसांनी ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करत हा ट्रक मायनिंग कंपनीला घेऊन जाण्यास मुभा दिल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. संबंधित ट्रकमधील मालाबरोबरच पोलिसांची ही चौकशी करण्याची मागणी होत आहे.सातार्डा येथे सेव्हन स्टार नावाची कोणतीही कंपनी नसतानाही सोमवारी पहाटे संशयास्पदरित्या एक ट्रक सातार्डा येथे एक चलन घेऊन व्यक्ति फिरत होती. या चलनावर कॅल्शिअम हायड्रोक्साईड असे लिहिले होते. यामुळे ग्रामस्थ घाबरले आणि नेमकी सेव्हन स्टार ही मायनिग कंपनी नसताना त्या कंपनीच्या नावाने कोणता माल आला, असा प्रश्न उपस्थित करत हा पदार्थ ज्वलनशील असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यात स्फोटकाचे सामान कशावरून नसेल म्हणून या ट्रकची कसून चौकशी करा, या मागणीसाठी सातार्डा सरपंच रंजना नाईक, सहदेव कोरगावकर, शंकर साटेलकर, पोलीस पाटील साटेलकर तसेच देवी माऊली हितवर्धक संघाने हा ट्रक पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केला.पोलिसांनी ही घटनेचे गांभीर्य ओळखून हा ट्रक पोलीस दूरक्षेत्रावर नेऊन ठेवला. त्याचवेळी तेथे ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यानंतर तेथे सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजित देसाई हे दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी सेव्हन स्टार मायनिंग कंपनीबाबत खुलासा करा, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी समृध्दा मायनिंगचे ठेकेदार दत्ता कवठणकर यांच्यासह कंपनीच्या अधिकाऱ्यांना तेथे बोलावले. यावेळी कवठणकर तेथे दाखल झाल्यावर ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रक तपासा, अशी जोरदार मागणी केली.या मागणीवर ग्रामस्थ अडून बसल्याने दत्ता कवठणकर व ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी तेथील पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण ट्रक तपासला नाही. आणि तो ट्रक गोव्याच्या दिशेने जाण्यास दिला. काही ग्रामस्थांनी ट्रक मध्ये चढून मालाची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यात मैद्याची पोती आढळून आली. मग चलनावर कॅल्शियम हायड्रोक्साईड लिहिलेले कसे, असा सवाल करीत ग्रामस्थांनी पोलिसांना धारेवर धरले तसेच ट्रक पाठवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्यासह सातार्डा येथील पोलिस कर्मचारी आर. डी. माने यांच्यावर आरोप करीत कारवाईची मागणी केली आहे. घटनेनंतर देवी माऊली हितवर्धक ट्रक चालक मालक संघाने कवठणकर यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करीत तक्रार दिली आहे.

पोलीस म्हणतात ‘ती’ पावडरसातार्डा येथे पकडण्यात आलेला ट्रक संशयास्पद नसून आतमध्ये ज्वलनशील पदार्थ नाही, असा दावा सावंतवाडी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी केला असून ट्रकमध्ये पावडर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)पत्रकाराचा कॅमेरा फोडलासातार्डा येथे ट्रक अडवण्याचा प्रकार सुरू असतानाच तेथे पत्रकार आपले कर्तव्य म्हणून फोटो घेण्याचे काम करत होता. यावेळी ठेकेदार दत्ता कवठणकर यांनी त्या पत्रकाराचा कॅमेरा फेकून देत मोडतोड केली. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी आणखी संताप व्यक्त केला.