शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या चौघांवर कारवाई, ९० हजाराचा मुद्देमाल जप्त

By सुधीर राणे | Updated: March 7, 2025 18:10 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचा दणका 

कणकवली: कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी येथे अवैधरित्या गांजाचे सेवन करताना आढळून आलेल्या चार जणांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल, गुरुवारी करण्यात आली.अकबर नुरमहमद पटेल (हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी), तुषार रावसाहेब करांडे (रा. कलमठ, बिडयेवाडी), प्रथमेश गणपत घाडीगावकर( रा. मठबुद्रुक, घाडीवाडी), भुषण मंगेश लाड (रा. भवानी अपार्टमेंट, नाथपैनगर, कणकवली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंमली पदार्थ सेवन, वाहतूक, साठवणूक, विक्री, परराज्यातून जिल्ह्यात होणारी तस्करी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच पोलिस ठाणेस्तरावरही कारवाईसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी, येथे काही व्यक्ती गांजाचे सेवन करीत असल्याची माहिती मिळाली. यामाहितीवरुन पथकाने कारवाई केली असता हरकुळ बुद्रुक, गावठणवाडी येथे अकबर पटेल, तुषार करांडे, प्रथमेश घाडीगावकर, भुषण लाड हे अंमली पदार्थांचे सेवन करताना ताब्यात घेण्यात आले. पोलिस हवालदार किरण देसाई यांच्या तक्रारीवरुन कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन चिलीम, लायटर, मोबाईल व एक दुचाकी असा ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई  पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील,  यांचे सुचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक, समीर भोसले,पोलिस उपनिरीक्षक  रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे व किरण देसाई यांच्या पथकाने केली. दरम्यान, या चौघा संशयित आरोपींना गांजा कोठे मिळाला याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस