Action taken against 240 people walking without mask in Sindhudurg | सिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर कारवाई

सिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर कारवाई

ठळक मुद्देसिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर कारवाईएकूण ४८ हजार रुपये दंड वसूल

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एका दिवसात, विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रामध्ये दोन दिवसांमध्ये एकूण२१७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये नगर पालिका, नगर पंचायतींकडून ४३ हजार ४०रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर पोलीस प्रशासनाकडूनही कार्यवाही करण्यात येत असून पोलीसांनी २३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नगर पालिका व नगर पंचायतीमार्फत कोविड नियमांचे पालन न केल्या प्रकरणी ४४ ठिकाणी अचानक भेट देण्यात आली. तर१४५  व्यायामशाळांची तपासणी करण्यात आली व कोविडचे नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १७ रेस्टॉरंट आणि २६ दुकांनांचीही तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी व्हावे व नियमांचे योग्य पालन करावे. मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतराचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Action taken against 240 people walking without mask in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.