शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अनधिकृत दारु वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:17 IST

 सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा कट्टा येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. 

ठळक मुद्देअनधिकृत दारु वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाईदारुसह अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा कट्टा येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत 9 लाख 96 हजाराच्या दारूसह 18 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक एकनाथ जयबल व रमराव जयभल रा. बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसात ही दुसरी मोठी कारवाई आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक रविराज फडनीस तसेच एस.जी.खांडारे, गुरूनाथ कोयंडे, अनिल धुरी, अनुप खंडे, प्रवीण वालावलकर, मनोज राऊत, जयेश सरमळकर यांनी ही कारवाई केली. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ट्रक सह 17 लाख 96 लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.संशयितांवर बांदा पोलिसांत गुन्हा दाखलस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला दारू वाहतुकी बाबत सुगावा लागला होता. त्यानुसार हे पथक बांदा येथे तैनात होते. दरम्यान दारू भरून ट्रक गोवा ते आंबोली मार्गे बीड येथे जात होता. दरम्यान हा ट्रक (एम.एच. 12- डिजी 8419) बांदा येथे आला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग