शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

वागदे डंगळवाडी येथे अपघात, कारसह अन्य तीन वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:00 IST

mumbai-goa highway, Accident, damage car मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे गोवा ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या एका कारला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर पलटी होऊन चाके वर झाली होती. कारमधील चालकासह ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देवागदे डंगळवाडी येथे अपघात, कारसह अन्य तीन वाहनांचे नुकसान चार जखमी, पोलीसपथक दाखल

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे गोवा ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या एका कारला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर उलटी होऊन चाके वर झाली होती. कारमधील चालकासह ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ६च्या सुमारास घडली.दरम्यान, अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी थांबलेल्या रुग्णवाहिका, दुचाकी आणि टेम्पोला दिलीप बिल्डकॉनच्या काँक्रीट मिक्सर वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिली. त्यामुळे त्या तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालकाचा ताबा सुटल्याने वागदे डंगळवाडी येथे कारला अपघात झाला. तेथील नागरिकांनी कळविल्यानंतर जखमींना नेण्यासाठी पिंट्या जाधव हे रुग्णवाहिका घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका थांबविलेल्या ठिकाणीच एक दुचाकी व टेम्पो होता.या तिन्ही गाड्यांना महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असलेल्या दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या काँक्रीट मिक्सर वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यामुळे तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी अनेक नागरिकांनी धाव घेतली.दरम्यान, जखमींना ओसरगाव माजी सरपंच बबली राणे व अन्य नागरिकांनी एका वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह कणकवली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम दाखल झाले होते.अपघातात चार जण जखमीवागदे येथील अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये कार चालक देवाशीष बनुमलीक खाडंगा (३६, रा. कांदिवली, मुंबई), तन्मय देवाशीष खाडंगा (८, रा. कांदिवली), स्वाती अशोक अगरवाल (३८) व सौरभ अशोक अगरवाल (३४, रा.कांदिवली, मुंबई) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग