शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार वैभव नाईक रत्नागिरीत एसीबी कार्यालयात हजर, तब्बल साडेसहा तास सुरु होती चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:32 IST

रत्नागिरी/कणकवली : उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी या ...

रत्नागिरी/कणकवली : उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी या प्रकरणाचा जबाब नोंदवण्यासाठी वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक रत्नागिरीत हजर झाले होते. तब्बल साडेसहा तास ही चौकशी सुरू होती. याप्रकरणी आता उघड चौकशीअंतर्गत त्यांचा जबाब घेण्यात आला आहे. कणकवली येथून वैभव नाईक सपत्नीक सकाळी रत्नागिरी येथे रवाना झाले होते. दुपारी १२ वाजता ते साडेसहा त्यांची चौकशी व जबाब सुरू होता.गेल्या दोन वर्षांत आपण तीन वेळा चौकशीला हजर राहिलो आहाेत. मी आणि माझ्या पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत, आम्ही खरेदी केलेल्या जागा याची माहिती मागितली गेली. आपण ती विहीत नमुन्यामध्ये सादर केली आहे. प्रतिज्ञापत्रावर आवश्यक असलेली माहिती तशा पद्धतीने दिली आहे. चौकशीच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आवश्यक ते सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहू, असे ते म्हणाले.

कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीआजपर्यंत झालेल्या चौकशीत आपण पुरेशी माहिती सादर केली आहे. पण, कदाचित राजकीय दबाव असेल किंवा काही अधिक माहिती हवी असेल म्हणून ही चौकशी लावण्यात आली असावी, असे ते म्हणाले. हा दबाव शिंदेसेनेत किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी आहे का, असा प्रश्न करण्यात आला असता, आपण उद्धवसेनेतच राहणार असून, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग