शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

Chipi Airport Inauguration: जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार; आदित्य ठाकरेंची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 14:00 IST

Chipi Airport Inauguration: दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणवासीयांना काही आश्वासने दिली. कोकण जगातील पर्यटकांचे आकर्षक केंद्र आहेच. मात्र, जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. (Aaditya Thackeray on Chipi Airport Inauguration Programme)

संपूर्ण कोकणवासीयांकडे खरोखरच आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो की, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू. या ठिकाणी येताना विमान लँड करत असताना कोकणाचे अद्भूत सौंदर्य पाहिले. निळे पाणी, लाल माती, मनमोहक समुद्र किनारा पाहिला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचाच जिल्हा आहे. या जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. त्यादृष्टीनेच पुढील काळात काम आणि योजना आखणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर

महाराष्ट्रातील कोकण हे संपूर्ण जगभरात पर्यटनाचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असून, यापुढे जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी काय करू शकतो, याकडे लक्ष देणार आहे. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत कोकणच्या विकासासाठी नवीन योजना आणण्यावर काम करणार आहोत. चांगल्या बसेस, चांगली वाहतूक आणि ५ स्टार हॉटेल आणणार आहे. मात्र, पर्यटनावर भर देताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याकडेही अधिक लक्ष दिले जाईल, विमानतळाच्या माध्यमातून पर्यावरण जोपासत कोकणचा विकास करूया, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. 

दरम्यान, अनेक वर्षांनी विमानतळाचा हा योग आला. अनेक वर्ष काम प्रलंबित होते असं अनेक जण म्हणतात. परंतु काम पूर्ण होण्यासाठी पायगुणही लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने, पायगुणाने हे काम पूर्ण झाले. खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने या विमातळासाठी पाठपुरावा केला. पाठपुरावा झाला नाही, असा एकही महिना त्यांचा गेला नाही. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळे कोकणवासीयांचा उत्कर्ष होईल. सर्वांनी चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केले तर काय होते हे या विमानतळाच्या दृष्टीने दिसून येते. कोकणवासीयांची जी स्वप्न आहेत ती नक्कीच साकार होतील. या विमातळामुळे पर्यटन वाढणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग