शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेमसंबंध नाकारल्याच्या रागातून युवतीचा खून, वेंगुर्ल्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:03 IST

याप्रकरणी तिच्या जवळच्या मैत्रिणीचा नवरा परुळे येथील गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली

वेंगुर्ले: तालुक्यातील मठ- कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे (२०) या युवतीचा मृतदेह शेजारीलच आडेली- वेतोरे हद्दीतील सीमेवरील एका बागेत आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी तिच्या जवळच्या मैत्रिणीचा नवरा परुळे येथील गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. हा खून सायलीने प्रेमसंबंध नाकारल्याने केला असावा असा अंदाज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे.कुडाळ येथे एका खासगी रुग्णालयात कामानिमित्त जाणारी सायली शनिवारी २७ ऑगस्ट सायंकाळपासून बेपत्ता होती. यामुळे तिचे वडील यशवंत लवू गावडे यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ती बेपत्ता असल्याची खबर वेंगुर्ला पोलिसात दिली. दरम्यान तिचा मृतदेह रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास वाजता काजूच्या बागेत वेतोरेतील एका युवकाला हा निदर्शनास आला.यावेळी घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस कोन्स्टेबल सुरेश पाटील, योगेश वेंगुर्लेकर, बंटी सावंत हे दाखल झाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक महेश घाग व पोलीस टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.गळा दाबून खून केल्याचा संशयसायली हिच्या डोक्याच्या पाठीमागे दुखापत झाली होती तर तोंडावर मारहाणीचे निशाण होते व नाकातून रक्त येत होते. तसेच तिच्या गळयाभोवती काळा व्रण दिसून आला असल्याने तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यानंतर हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.प्रेमसंबंध नाकारल्याने केले कृत्ययावेळी कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार गोविंद माधव सहित ४ संशयिताना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सायली हिने प्रेमसंबंध नाकारल्याने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून व हाताने मारहाण करून गोविंद माधव यानेच तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस