शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत नगरपरिषदेच्या स्विमिंग पुलात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 11:50 IST

सावंतवाडीतील स्विमिंग पूलात हा पहिलाच प्रकार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्विमिंग पूलात पोहण्यासाठी आलेल्या ग्लेन जाॅन डिसोझा (20 रा.चराठे सावंतवाडी) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुलाने स्विमिंग पूलात उडी मारल्यानंतर तो वरच आला नसल्याचा दावा तेथे प्रशिक्षण देणाऱ्यांनी केला आहे. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच मुलांच्या बॅगे मोबाईल सह इतर साहित्य ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.सावंतवाडी नगरपरिषदेचे जिमखाना मैदाना शेजारी स्विमिंग पूल असून गेली अनेक वर्षे ते बंद होते. मात्र मागील पाच महिन्यांपासूनच सावंतवाडी नगरपरिषद कडून ते खाजगी ठेकेदारास चालवण्यास देण्यात आले होते. त्याचा ठेका  शहरातीलच संस्थेला देण्यात आला होता.ते येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण देत होते.ग्लेन डिसोझा हा एक महिन्यापूर्वीच याठिकाणी आला होता. तो चांगला प्रशिक्षित ही झाला होता. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो स्विमिंग साठी आल्यानंतर त्याने प्रथम स्विमिंग पूलात उडी मारली मात्र तो बराच वेळ तो वरच आला नसल्याने लागलीच प्रशिक्षकांनी त्याला बाहेर काढले तो पर्यत तो बेशुद्ध झाला होता. त्याला स्विमिंग पूलातून बाहेर काढून येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले पण रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर नगरपरिषद चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी याठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षकाकडून माहिती घेतली तसेच ग्लेन यांचे कपडे मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर ग्लेन याच्या नातेवाईकांना पोलिसांनी संपर्क केला. नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्काच बसला पोलीसांनी त्यांना कसेबसे सावरले. तरीही त्याचा घटनेवर विश्वास बसत नव्हता. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस करीत आहेत.कुणाचा निष्काळजीपणा झाला, याचा शोध घेऊआम्ही सध्या माहिती घेत आहे.यात कुणाची चूक झाली का?कुणाच्या निष्काळजी पणा मुळे ग्लेन यांचा मृत्यू झाला का ?हे सर्व तपासण्यात येणार असून त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी यावेळी सांगितले.घटनेने खळबळ व भीतीचे वातावरण नगरपरिषद कडून ज्या संस्थेला ठेका देण्यात आला त्यांनी या पूर्वी कुठे प्रशिक्षण दिले होते का याबाबत पोलीस माहिती घेणार असून सावंतवाडीतील स्विमिंग पूलात हा पहिलाच प्रकार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू