शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग हादरला; स्टोन क्रशरवरील कामगाराने मुकादमासह एकाचा केला खून; मृत, संशयित नाशिकचे

By सुधीर राणे | Updated: May 2, 2025 12:29 IST

प्रकाश काळे  वैभववाडी ( सिंधुदुर्ग ): नाधवडे येथे स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या एका कामगाराने मुकादम आणि सहकारी कामगाराचा निर्दयपणे ...

प्रकाश काळे वैभववाडी (सिंधुदुर्ग): नाधवडे येथे स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या एका कामगाराने मुकादम आणि सहकारी कामगाराचा निर्दयपणे खून केला. धनेश्वर सत्यनारायण चौधरी (वय ६६) आणि मनोज सिंग (३०) अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मृत व संशयित आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील असून पोलिसांनी संजय बाबुराव लोखंडे (३८) याला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) घडली. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गापासून आतमध्ये नाधवडे येथे स्टोन क्रशर आहे. या क्रशरवर धनेश्वर चौधरी हे मुकादम म्हणून काम करीत होते. क्रशरला कामगार पुरविण्याचा ठेका त्यांच्याकडे होता. क्रशरवर सात कामगार होते. या कामगारांना राहण्यासाठी शेड उभारण्यात आलेली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी संशयित आरोपी संजय लोखंडे आणि काही कामगारांमध्ये किरकोळ वाद झाले होते. बऱ्याचदा तो कामगारांशी वेगवेगळ्या कारणांवरुन वाद करायचा. बुधवारी वादानंतर सर्व कामगार आपआपल्या खोल्यांमध्ये गेले. रात्रीच्या सुमारास मुकादम धनेश्वर चौधरी राहत असलेल्या खोलीतून बाजुच्या खोलीतील कामगारांना झटापटीचा आवाज आला. त्यामुळे ते उठुन धनेश्वरच्या खोलीकडे गेले तेव्हा त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दोन कामगारांनी खोलीचा दरवाजा तोडुन खोलीत प्रवेश केला असता संशयित आरोपी संजय मुकादम धनेश्वर यांच्यावर बसुन चाकुने वार करीत होता. कामगारांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना कामगारांनी त्याला एका खोलीत ढकलून दरवाजा बंद केला. त्यानतंर मनोज सिंग कुठे न दिसल्यामुळे कामगारांनी त्याला फोन केला. तेव्हा तेथून २०० मीटर अतंरावर त्याचा मोबाईल वाजला. त्यामुळे तिकडे जाऊन पाहीले तर मनोजही मृतावस्थेत आढळला. त्याच्या अंगावर धारदार हत्याराच्या जखमा कामगारांना दिसल्या.या घटनेची माहिती त्या कामगारांनी पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्यासह पोलिस पथक  घटनास्थळी पोहोचले. संशयित संजय लोखंडे याला त्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान या हत्याकांडाने जिल्हा हादरुन गेला आहे. हत्याकांडाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आडाव, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक, श्वानपथक, रत्नागिरी येथील प्रयोगशाळा तज्ञ, ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस