शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Sindhudurg: जानवली येथील अपघाताचा सखोल तपास करावा, ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:36 IST

..अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय-लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातात शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. त्या दोघांना धडक देणाऱ्या वाहन चालकावर ३०४ कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप कांबळे व जानवली, बौद्धवाडी येथील ग्रामस्थानी केली आहे. कणकवली पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अ‍ॅड. कांबळे यांनी योग्य ती कार्यवाही न झाल्यास गुरुवारी २५ एप्रिलला कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिले. या अपघात प्रकरणाबाबत २२ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे  कांबळे यांनी  यावेळी सांगितले.जाधव माय-लेकाच्या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जानवली सरपंच अजित पवार, भाई जाधव, मंगेश पवार, बाळा डांगमोडेकर, नागेश पवार, दिपा पवार, सुनिता पवार, प्रतिभा जाधव, सुनिता डागमोडेकर, डॉ. राहुल पवार, प्रियांका पवार, क्रांती पवार, मेघा पवार, श्रद्धा तळवडेकर, प्रज्ञा तळवडेकर यांच्यासह जाधव यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शरद देठे  उपस्थित होते.मंगला जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारसह पसार झालेल्या चालकास फोंडाघाट तपासणी नाका येथे कार्यरत पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी मनोज पाटील व शरद देठे यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅड. कांबळे म्हणाले, मंगला जाधव या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा खर्च करताना जाधव कुटुंबियांची दमछाक होत आहे.अपघातानंतर पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला नाही. चालकाला अभय मिळेल, अशी कलमे गुन्हा दाखल करताना लावण्यात आली आहेत. अपघातापासून आजपर्यंत शरदचंद्र जाधव याच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतलेला नाही.  कार चालक तोच होता का?, अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज का घेण्यात आले नाही, असे सवाल अ‍ॅड. कांबळे व जाधव यांच्या कुटुंबियांनी पोलिस अधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात