शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत खिडकीतून चिमुकलीच्या हातावरच सापाने उडी मारुन केला दंश, कणकवलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 14:26 IST

सापाला एका बरणीत भरून आणण्यात आल्याने ओळख पटण्यास मदत झाली

कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. स्वरा संतोष घाडीगावकर(रा.वागदे, सावरवाडी) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्या विद्यार्थिनीला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे ,युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शाळेच्या आवारात हा प्रकार घडला असल्याने त्या विद्यार्थिनीवर योग्य उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयात तत्काळ उपचारा करता दाखल करा अशी मागणी त्यांनी तसेच ग्रामस्थानी केली.  त्यानंतर कणकवली येथील खासगी रुग्णालयात त्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले.गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वरा घाडीगावकर ही मुलगी शाळेतील वर्गात खिडकीजवळील  बेंचवर बसून आपल्या वहीमध्ये काही तरी लिहीत होती. त्यामुळे तिच्या हातातील पेनाची हालचाल सुरू होती.  त्याचवेळी खिडकीच्या झडपावर एक मण्यार जातीचा साप होता. त्याने हालचाल होत असलेल्या पेनवर अचानक उडी मारली. तसेच स्वरा हिच्या हाताला दंश केला. अचानक हा प्रकार घडल्याने शाळेच्या वर्गात  एकच गोंधळ उडाला. इतर मुलेही घाबरली. शिक्षकांनी स्वरा हिच्या कुटुंबियांना या घटनेबाबत माहिती दिली. तसेच तत्काळ कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. सोबत त्या मण्यार जातीच्या सापालाही एका बरणीत भरून आणण्यात आले होते. त्यामुळे सापाची ओळख पटण्यास मदत झाली.प्रकृती स्थिरतिच्यावर तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संतोष चौगुले व अन्य डॉक्टरानी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर आहे,असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गsnakeसापStudentविद्यार्थीSchoolशाळा