शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

करूळ घाटात डोंगर कोसळला; वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक पुन्हा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:27 IST

किरवे-लोंघे दरम्यान रस्त्यावर पाणी

वैभववाडी : पावसाचा जोर सोमवारपासून कमी झाला असला तरी अजूनही पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा-कोल्हापूर किरवे ते लोंघे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, तर वाहतूक बंद असलेल्या करूळ घाटात या आठवड्यात दुसऱ्यांदा डोंगर रस्त्यावर कोसळला आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सोमवारपासून (ता.२२) जोर ओसरला आहे. मात्र वादळीवाऱ्यांसह अधुनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सायंकाळी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडकुली, खोकुर्ले येथील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे किरवे ते लोंघेदरम्यान पुन्हा रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग पुन्हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. वैभववाडी-गगनबावडा दरम्यान करूळ घाटात मंगळवारी (ता.२३) सायंकाळी पुन्हा डोंगर कोसळला. दगड, माती आणि झाडांच्या भरावाने ६० ते ७० मीटरचा रस्ता व्यापला आहे. परंतु सध्या हा घाटरस्ता वाहतुकीस बंद असल्यामुळे या पडझडीचा परिणाम जाणवला नाही. सतत कोसळणाऱ्या डोंगरांमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे.पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. काही भागांत वादळीवाऱ्यांसह सरी पडत आहेत. त्यामुळे काही मार्गांवर झाडे उन्मळून पडणे, वीजवाहिन्या तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नावळे येथे संभाजी रावराणे यांच्या गोठ्यावर झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलन